चावट भुंगा

चावट भुंगा "भवरेने खिलाया फुल.. फुलको बेच रहा राजकुंवर" गाणं चुकलं का.. जाऊ द्या सध्या विकायचे दिवस सुरू आहेत. मात्र कवी आणि शाहिरांनी सर्वात जास्त प्रेम कोणत्या कीटकावर केलं असेल, तर तो म्हणजे भुंगा होय! कितीतरी लावणी, भावगीते, भक्तिगीतांमध्ये भुंग्याच्या गुंजारवाची दखल घेतली आहे. खरं तर याची भूणभूण डासापेक्षा किती तरी तीव्र असते, मात्र तरीही एखादी व्यक्ती प्रेमात असेल, त्यावेळेस तिला ही भुणभुण गोड गुणगुण वाटते, आणि त्यावर ती कविता लिहिते. अर्थात प्रेमात असताना व्यक्तीला आपल्या जोडीदाराचं बोलणं देखील गुणगुण वाटत असतं, मात्र लग्न झाल्यावर ती भूणभूण वाटायला लागते!! शृंगारकाव्यात भुंगा चावट म्हणून का बदनाम केला आहे काय माहित? कारण भुंगा अजिबात चावट नसतो. नर भुंगा खरं तर पोट भरायला या फुलापासून त्या फुलावर जात असतो. कामानिमित्त विविध व्यक्तींना भेट देणाऱ्या व्यक्तीला थोडीच आपण बदनाम करत असतो का? नाही ना.. म्हणजे भुंगा अजिबात चावट नाही. गंमत म्हणजे परागवेचनाचं काम मादीपेक्षा अधिक निगुतीनं नर करत असतो, नर भुंगा असेल तर फुलाची काळजी घेतली जाते. मादीवर जर पराग वेचायची वेळ आ...