Posts

Showing posts from April, 2025

शेंडी जाणवे आणि दाढी टोपी

Image
शेंडी जाणवे आणि दाढी टोपी ११ जुलै रोजी फुले हा सिनेमा प्रदर्शित होत आहे, ज्याचा टीजर नुकताच रिलीज झाला असून त्यावर ब्राम्हण महासंघाने आक्षेप नोंदवला आहे. शाळेत मुलींना शिकवायला जाणाऱ्या सावित्रीमाईवर एक शेंडी जाणवे धारी बटू शेण फेकतो असे दृश्य आक्षेपार्ह आहे असे त्यांचे म्हणणे आहे. शेंडी जाणवे हा आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे, त्याचा अपमान सहन केला जाणार नाही असा रास्त इशारा त्यांनी दिला आहे. मुळात दिग्दर्शकाला समजायला पाहिजे होते की शेंडी जाणवे ही या देशाची संस्कृती आहे, त्याला खलनायकी वृत्ती दाखवायची असतील तर सध्या ट्रेंड मध्ये असलेली दाढी टोपी ही प्रतीके दाखवायची होती ना.. आपण कोणत्या देशात राहतो एवढे पण अनंत महादेवन या दिग्दर्शकाला समजू नये का?त्यांना समजत नसेल तर मी या चित्रपटासाठी दोन दृश्य नव्याने लिहितो..जी या बदलत्या भारतासाठी एकदम ओके असतील.. १) हिरव्या रंगाचे एक घर, मागे नमाजाची बांग ऐकू येते आहे. बचकभर सुरमा लावलेला, दाढी लाल रंगाने रंगवलेला उस्मान दारूचे घोट पित बसला आहे..तेव्हढ्यात अब्दुल धावत येतो..दोघांच्या डोक्यावर दाढी टोपी आहे उस्मान: क्या हुवा अब्दुल अब्दुल: ...