Posts

Showing posts from June, 2025

दहावी बॅचचे व्हॉट्सअप ग्रुप🥳

Image
दहावी बॅचचे व्हॉट्सअप ग्रुप🥳 96 हा चित्रपट आला आणि शाळेच्या बॅचचे गेटटुगेदर करण्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. गेट टुगेदरमध्ये आपल्याला शाळा कशी आवडत होती, आपण शाळेत किती धमाल केली आणि शाळेने आपल्याला कसे घडवले हे माजी विद्यार्थ्यांकडून ऐकताना त्यांच्या खोटेपणाचा शिक्षकांना किती वैताग येत असेल. 😭 मात्र ते मुकाट सहन करतात, कारण कधी नाही ते कौतुक त्यांना ऐकायला मिळतं आणि या निमित्ताने शाळेला भरीव मदत देखील मिळते. 😎 मग या रविवारी 95 ची बॅच, पुढच्या रविवारी 93 ची बॅच… असे 1985 पासून 2015 पर्यंत म्हणजे जवळजवळ तीस वर्षांच्या तुकड्यांच्या गेट टुगेदरचे वेळापत्रक तयार केले जाते. उत्सवप्रिय समाजाला हा नवीन उत्सव मिळाला आहे. 🥳🥳 यानिमित्ताने बॅचचे व्हॉट्सअप ग्रूप तयार केले जातात. इथे बॅकबेंचर मुलांना आपले कर्तृत्व, आपले नेतृत्व सादर करण्याची संधी मिळालेली असते. 😇 मग दिवसभरात वेगवेगळ्या पोस्टचा (त्यादेखील fwded) पाऊस पाडताना त्यांना वर्गात उत्तरे देऊ न शकल्याचे शल्य विसरता येते. 🤣त्या काळात आपल्या प्रेमभावना व्यक्त न करू शकलेल्या मुलांना तर हा प्लॅटफॉर्म मिळून जातो. 😍मग जरी त्या काळ...