दहावी बॅचचे व्हॉट्सअप ग्रुप🥳
दहावी बॅचचे व्हॉट्सअप ग्रुप🥳
96 हा चित्रपट आला आणि शाळेच्या बॅचचे गेटटुगेदर करण्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. गेट टुगेदरमध्ये आपल्याला शाळा कशी आवडत होती, आपण शाळेत किती धमाल केली आणि शाळेने आपल्याला कसे घडवले हे माजी विद्यार्थ्यांकडून ऐकताना त्यांच्या खोटेपणाचा शिक्षकांना किती वैताग येत असेल. 😭 मात्र ते मुकाट सहन करतात, कारण कधी नाही ते कौतुक त्यांना ऐकायला मिळतं आणि या निमित्ताने शाळेला भरीव मदत देखील मिळते. 😎 मग या रविवारी 95 ची बॅच, पुढच्या रविवारी 93 ची बॅच… असे 1985 पासून 2015 पर्यंत म्हणजे जवळजवळ तीस वर्षांच्या तुकड्यांच्या गेट टुगेदरचे वेळापत्रक तयार केले जाते. उत्सवप्रिय समाजाला हा नवीन उत्सव मिळाला आहे. 🥳🥳
यानिमित्ताने बॅचचे व्हॉट्सअप ग्रूप तयार केले जातात. इथे बॅकबेंचर मुलांना आपले कर्तृत्व, आपले नेतृत्व सादर करण्याची संधी मिळालेली असते. 😇 मग दिवसभरात वेगवेगळ्या पोस्टचा (त्यादेखील fwded) पाऊस पाडताना त्यांना वर्गात उत्तरे देऊ न शकल्याचे शल्य विसरता येते. 🤣त्या काळात आपल्या प्रेमभावना व्यक्त न करू शकलेल्या मुलांना तर हा प्लॅटफॉर्म मिळून जातो. 😍मग जरी त्या काळात चवळीची शेंग असलेली क्रश आता ढोबळी मिरची झाली असेल, किंवा स्वतःचा ढेऱ्या गणपती झाला असेल, दाढी पिकून तिचा महेंद्रसिंह धोनी झाला असेल, तरी त्या क्रशच्या good morning ला good morning चे उत्तर देताना त्यांच्या हृदयात फुलपाखरे उडत राहतात. 🥰🥰🥰 (असू दे बाबा.. बिचारे त्यांचा आनंद ते घेतात, तर आपल्याला काय करायचं आहे.)
नास्तिक व्यक्तीला मात्र शाळा कॉलेजचे ग्रुप खूप ताप देतात. तुम्ही रोज त्यांचे देवाचे फोटो आणि त्यावरील “शुभ अमुकवार” सहन करायचे.. मात्र तुमचा एक चिकित्सक मेसेज सहन केला जात नाही..😡 ग्रुपवर लगेच तू असाच, तू नेहमीच असे करतो वगैर सुनावले जाते. केवळ राक्षस, पापी, नीच वगैरे म्हणायचे बाकी ठेवलेले असते, मात्र रोख तोच असतो..😞 वर्गातील चुणचुणीत (खर तर चोंबडी हा शब्द अधिक योग्य) पोरगी लगेच पर्सनल मेसेज पाठवते की दुर्लक्ष कर रे. टेन्शन घेऊ नको.. 😄ही चुणचुणीत पोरगी तुम्हाला ना तेव्हा कधी आवडली होती, ना आता आवडत असते.. तरी स्त्रीदाक्षिण्य दाखवत तुम्ही शांत बसता. 🤭
रिअल इस्टेट एजंटचा व्यवसाय करणारा, मात्र सामाजिक कार्यकर्ते असे बिरूद लावणारा मित्र तुम्हाला ताकीद देतो की हा केवळ शाळेचा ग्रुप आहे त्यावर सामाजिक, राजकीय मेसेज टाकू नयेत.🥱 इथे विसंगती आहे हे त्याच्या किंवा इतरांच्या लक्षात येत नाही. सात आठ देव (अर्थात केवळ हिंदू देवदेवता) एकत्र कोंबून केलेली शुभ अमुकवार हा मेसेज फक्त धार्मिक नसतो तर तो सामाजिक देखील असतो आणि राजकीय देखील. 🤭 हिरव्या रंगाच्या कपड्यातील अफजल खानचे भगव्या रंगाच्या कपड्यातील शिवाजी महाराजांनी पोट फाडणे आणि त्यावर दहशतवाद असाच संपवावा लागतो.. असे लिहिलेले हे राजकीयच नसते का?? मात्र समोरच्यांना ते पटत नाही. अशा वेळी समोरच्या निर्बुद्ध किंवा शहामृगी मित्र मैत्रिणींचा आपल्याला वैताग येतो आणि आपण ग्रुप सोडतो.😞😞
#richyabhau
आपला ब्लॉग: https://richyabhau.blogspot.com/
सत्य कथन..
ReplyDeleteअशा बऱ्याच ग्रुप्समधून लेफ्ट झालोय मी, कित्येक ग्रुप्समधून मला काढलं.
ReplyDeleteआपली प्रजाती त्यांच्यात टिकणे कठीण,
आपण त्यांचं सगळं सहन करतो, पण ते आपलं एक वाक्यही सहन करत नाहीत.
90% धार्मिक मेंढरं त्याच वृत्तीची आहेत
सखोल निरीक्षण आणि लिखाण ही 👍
ReplyDelete