Posts

Showing posts from January, 2026

डॉ. शांतिस्वरूप भटनागर : द अप्लाइड सायंटिस्ट

Image
डॉ. शांतिस्वरूप भटनागर : द अप्लाइड सायंटिस्ट भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, अभियांत्रिकी, गणित, औषधशास्त्र आणि पर्यावरणशास्त्र या विषयांमध्ये लक्षणीय कामगिरी करणाऱ्या युवा संशोधकांना भारतात दरवर्षी शांतिस्वरूप भटनागर विज्ञान आणि तंत्रज्ञान पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येतं. हे शांतीस्वरूप भटनागर म्हणजे नक्की कोण असा प्रश्न कदाचित पुढच्या पिढीला पडेल. शेकडो वर्षाच्या गुलामीनंतर स्वतंत्र झालेल्या आपल्या देशामध्ये विज्ञानाची पायाभरणी करण्याचं काम ज्या शास्त्रज्ञांनी केलं, भारतामध्ये संशोधन संस्थांची साखळी ज्यांनी उभारली, त्यात डॉ. शांतिस्वरूप भटनागर हे एक महत्त्वाचं नाव. सामान्य माणसाच्या जीवनामध्ये तसेच उद्योगधंद्यांमध्ये ज्यांनी वैज्ञानिक संशोधनाचा उपयोग केला, त्या डॉ. शांतिस्वरूप भटनागर यांच्या जीवनाचा प्रवास खूपच रंजक आहे.  आता पाकिस्तानात असलेल्या शाहपूर जिल्ह्यातील भेडा नावाच्या छोट्या गावात २१ फेब्रुवारी १८९४ या दिवशी एका शिक्षकाच्या घरात शांतीस्वरूपचा जन्म झाला. त्याचे आजोबा रायबहादुर मनोहरलाल मुंशी आणि त्यांचे दोन भाऊ हे ब्रिटिश न्यायव्यवस्थेमध्ये महत्त्वाच्या...

आपली पुस्तके

Image
आजवर प्रकाशित झालेल्या आपल्या सर्व पुस्तकांची माहिती इथे आहे..   १) पाथमेकर्स लेखक : डॉ. नितीन हांडे विषय : लिंगभेदाच्या अडथळ्यांवर मात करून स्त्री संशोधकांसाठी नवीन रस्ता निर्माण करणाऱ्या बारा स्त्री शास्त्रज्ञांची कहाणी..  सकाळ प्रकाशन.              किंमत : २७०/- रुपये या पुस्तकाला मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळाला आहे.    २) की की की की कीटक लेखक : डॉ. नितीन हांडे विषय : आपल्या भवताली असणाऱ्या कीटकांच्या विश्वाची रंजक माहिती. न्यू इरा पब्लिकेशन              किंमत: २०० रुपये या पुस्तकाला कृष्णाई कुंडल पुरस्कार मिळाला आहे.      ३) सायंटिस्ट खोपडी.. बेलपासून नोबेलपर्यंत.. लेखक : डॉ नितीन हांडे  विषय : वेगवेगळ्या रंगात रंगलेल्या २७ शास्त्रज्ञांचे किस्से आणि त्यांनी लावलेले शोध यांची रंजक माहिती.. वैज्ञानिक दृष्टिकोनाचे वेगवेगळे पैलू मजेशीय पद्धतीने पुढे आणणारे हे पुस्तक.  न्यू इरा प्रकाशन             किंमत ३००/- ४) मेलुहा ते भार...

राजा रामण्णा : बुद्धाला हसवणारा शास्त्रज्ञ

Image
 राजा रामण्णा : बुद्धाला हसवणारा शास्त्रज्ञ १९७१ मध्ये झालेलं भारत पाक युद्ध, यामध्ये अनावश्यक अमेरिकन हस्तक्षेप होऊ लागला. मात्र त्याला न जुमानता पाकिस्तानवर निर्णायक विजय मिळवण्यात भारताला यश आलं. यावेळी जाणीव झाली होती की अण्वस्त्रधारी देशांच्या मनमानी दंडुकेशाहीतून बाहेर पडायचं असेल, तर भारताला स्वतःला अण्वस्त्रधारी बनावं लागेल. १९६५ तसेच १९७१ मधील युद्धांमध्ये झालेले लागोपाठचे पराभव पाकिस्तान पचवू शकणार नाही आणि पुन्हा मोठ्या युद्धाला तोंड फुटू शकेल अशी परिस्थिती होती.‌ १९६२ मध्ये भारतावर विजय मिळवल्यानंतर चीननं लगेचच १९६४ मध्ये अणुचाचणी करून स्वतःची क्षमता वाढवली होती. या पार्श्वभूमीवर भारत अण्वस्त्रसज्ज होणं अत्यंत गरजेचं होतं. अखेरीस १९७४ मध्ये पोखरणमध्ये चाचणी घेऊन भारतानं अण्वस्त्रधारी देशांच्या यादीत स्वतःचं नाव नोंदवलं. डॉ. राजा रामण्णा हे या चाचणीचे शिल्पकार होते.   १९४५ मध्ये जपानवर अणुबॉम्ब टाकण्यात आले आणि दुसरं जागतिक महायुद्ध थांबलं.‌ या घटनेतून जग आणि सत्तांचे नकाशे बदलले. नवी राष्ट्रं जन्माला आली.‌ १९४७ मध्ये जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं, तेव्हा द...