डॉ. अब्दुस सलाम : सीमेपलीकडचा वैज्ञानिक
डॉ. अब्दुस सलाम : सीमेपलीकडचा वैज्ञानिक “विज्ञानाला कोणताही धर्म नसतो, देशांची सीमा नसते” असं सांगणारा एक शास्त्रज्ञ, ज्याला नोबेल पारितोषिक मिळालं तरीदेखील त्याच्या देशानं “तो केवळ वेगळ्या पंथाचा आहे” म्हणून त्याला स्वीकारलं नाही. विज्ञानामध्ये नोबेल मिळवणारा पहिला मुस्लिम शास्त्रज्ञ, ज्याच्या देशामध्ये त्याला तो अहमदिया पंथाचा आहे म्हणून मुस्लिम धर्मातून बहिष्कृत करण्यात आलं आणि दुय्यम दर्जाचा नागरिक ठरवण्यात आलं. पाकिस्तानला आजवर केवळ दोन नोबेल पुरस्कार मिळाले आहेत, ज्यातील एक पुरस्कार मलाला युसूफजाईला शांततेसाठी मिळाला असला तरी तिच्या कैक दशकं आधी पाकिस्तानला विज्ञानासाठी नोबेल पुरस्कार मिळाला होता. मात्र या करंट्या या देशानं पुरस्काराची आणि तो मिळवणाऱ्या डॉ. अब्दुस सलाम यांची किंमत ओळखली नाही. डॉ. अब्दुस सलाम यांचा जन्म २९ जानेवारी १९२६ रोजी आज मध्य पाकिस्तानात असलेल्या झांग शहरामध्ये झाला. वडील मोहम्मद हुसेन हे त्यांचा पिढीजात हकीमीचा धंदा सांभाळत एका शाळेमध्ये शिक्षकाची नोकरी करत होते. मोठे चुलते हे शिक्षण खात्यात मोठे अधिकारी होते. मोहम्मद हुसेन यांची पहिली बायको सईद...