जोनास साक : पोलिओ लस शोधणारा मानवतावादी

जोनास साक : पोलिओ लस शोधणारा मानवतावादी आज कोरोना विषाणूवरच्या लसीची आपण उत्कटतेने वाट पाहत आहोत.. जवळजवळ हे संपूर्ण वर्ष आपण कोरोना दहशतीखाली काढले आहे. विषाणू कसा रूप बदलत आहे हे तर पाहिले, आणि इंग्लंड अमेरिका सारख्या फाजील आत्मविश्वास दाखवणाऱ्या देशांना कसा धडा मिळाला आहे हे सुद्धा पाहत आहोत. कोरोनासोबतचा लढा अजून किती दिवस, महिने चालेल माहीत नाही. मात्र काही रोगावर आपण निश्चितपणे कायमची मात केली आहे. देवी, पोलिओ ही त्याची उदाहरणे.. देवीची लस शोधणाऱ्या एडवर्ड जेन्नरचे नाव आपल्याला शालेय पुस्तकातून माहिती असते.... मात्र पोलिओची लस सर्वप्रथम कोणी शोधली हे अनेक जणांना ठाऊक नसते.😭 असं म्हणतात की १९४० च्या दशकात अमेरिका दोन महायुद्धांमध्ये सहभागी होती, जागतिक महायुद्ध आणि पोलिओ विरुद्धची लढाई. दरवर्षी पन्नास हजारपेक्षा जास्त मुलांना पोलिओ होतं होता, त्यातील हजारो मुलांना अपंगत्व येत होते. उन्हाळा आला की पोलिओची साथ आलीच. आता कोरोनाकाळात आहे त्याप्रमाणे तेव्हादेखील स्विमिंगपूल बंद केले जायचे, सिनेमा हॉलमध्ये जागा मोकळ्या ठेवल्या जायच्या. दरवर्षी हाच सीन. 😭 खुद्द राष्ट्राध्यक...