मिलेव्हाा मारीक (आईन्स्टाईन) : कालसापेक्ष उपेक्षित अबोली

मिलेव्हाा मारीक (आईन्स्टाईन) : कालसापेक्ष उपेक्षित अबोली. कहाणी १. एकोणीसावं शतक संपत असताना एका संस्थेमध्ये एक मुलगी गणित आणि शास्त्र शिकण्यासाठी दाखल होते. संपूर्ण वर्गामध्ये ती एकमेव महिला असते. शिक्षण घेत असताना एका सहाध्यायाच्या प्रेमात पडते, गर्भवती होते, त्यामुळे शिक्षणाकडं दुर्लक्ष होतं, आणि पदविका न मिळवता तिला बाहेर पडावं लागतं. ती त्या सहाध्यायाशी लग्न करते.. तिच्या आयुष्यात ती कधीच चमकलेली दिसत नाही, मात्र तिचा नवरा खूप मोठा शास्त्रज्ञ होतो. त्याच्यापासून वेगळे झाल्यानंतर पंधरा वर्षांनी ती दावा करते की नवऱ्याच्या संशोधनामध्ये माझंदेखील महत्त्वाचं योगदान आहे. मात्र तिचं बोलणं कोणीही गंभीरपणे घेत नाही.. कहाणी २. एक दिलफेक स्वभावाचा देखना, हुशार आणि व्हायलीन वगैरे वाजवणारा मुलगा.. थोडक्यात डीडीएलजे मधील आपला शाहरुख.. नुकतचं ब्रेक-अप झाल्यामूळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी धडपडणारा… शिक्षण घेण्यासाठी संस्थेमध्ये दाखल होतो, वर्गामध्ये असलेल्या एकमेव मुलीच्या मागे लागतो. ती मुलगी दिसायला साधारणच, मात्र प्रचंड बुद्धिमान. कदाचित या बुद्धिमत्तेच्या तेजानेच त्याचे डोळे ...