महाकवी वामनदादा कर्डक : एक वादळवारा

महाकवी वामनदादा कर्डक : एक वादळवारा "माणसा इथे मी तुझे गीत गावे, असे गीत गावे तुझे हित व्हावे.. असे तुझे माझे नाते जडावे तुझ्या संकटाशी इथे मी लढावे.. माणसा इथे मी तुझे गीत गावे...." आपली प्रतिभावंत लेखणी आणि आपली धारदार वाणी माणसाच्या कल्याणासाठी झिजवणाऱ्या वामनदादा कर्डक यांचं जन्मशताब्दीवर्ष येत्या १५ ऑगस्ट रोजी सुरू होत आहे. शाहिरी जलसा हे आंबेडकरी चळवळीच महत्त्वाचं अंग. नव्या युगाचे नवे विचार गावागावात पोचवण्याचं काम महाराष्ट्रातील लोकशाहीरांना जाईल.. आणि या शाहिरी परंपरेचा मानबिंदू म्हणून वामनदादा यांचं नाव आदराने घेतले जाईल...फक्त शाहीर नाही तर महाकवी उपाधीने गौरवण्यात येणारे वामनदादा एकमेवच.. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की माझ्या दहा भाषणाचे काम शाहीरांचे एक गाणे करते.. दलीत, श्रमिक, शेतकरी वर्गाच्या प्रश्नांना वाचा फोडत.. समतेचा, जातीवर्गदास्यअंताचा, स्त्रीस्वातंत्र्याचा प्रचार करत आणि संयुक्त महाराष्ट्राचा जागर करत शाहीर अमर शेख, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर गवाणकर यांच्या डफांनी महाराष्ट्रात रान पेटवलं. वामनदादा कर्डक हे देखील त्यात आघाडीवर होते. दुर्दैवाने अमर ...