Posts

Showing posts from April, 2022

शनि आणि साडेसाती

Image
शनि आणि साडेसाती. सूर्यमालेतील सूर्यापासून सहावा आणि आकाशातील उघड्या डोळ्यांनी दिसणारा सर्वात दूरचा ग्रह.. भोवती असलेल्या कड्यांमुळे दुर्बिणीतून अतिशय सुंदर दिसतो, मात्र त्याला जेवढं बदनाम केलं आहे, तेव्हढ इतर कुणालाच नाही. गब्बर, मोग्यांबो, शाकाल, जगिरा या सर्वांची दहशत एकत्र केली तरी एका शनि पुढं फिकी होऊन जाते. त्यात त्याला काळा रंग जोडून अंधारयात्री करून टाकलं आहे. आणि तमराज किल्विष म्हणतो तसं "अंधेरा कायम रहे" हा मंत्र काही लोकांच्या फायद्याचा ठरतं असतो. 🦹🏽‍♂️   आजवर शनिदेवावर जेवढे सिनेमे, मालिका आल्या, तिथं शनि काळे कपडे, काळा गंध लावूनच दिसला आहे. फोटोमध्ये पण पाहा ना.. कावळ्यावर बसलेल्या या शनिदेवला प्रसन्न करण्यासाठी काय काय लागतं.. काळे तीळ, काळे कापड, काळे उडीद... मी तर त्याला प्रसन्न करायला रीबनचा काळा गॉगल पण दिला आहे.😂 पण मुळात शनि आणि काळा हा संबंध आला कसा?? मला वाटतं की शिंगणापूरची शिळा काळी आहे म्हणून तर शनिला ब्लॅक लिस्टेड केलं नाही ना...की काळी आहे म्हणून तिला तिथं बसवली.. कुणी तरी शोधा राव..    खर तर आकाशातील शनि ग्रहाचा आणि शि...

एक एप्रिल च्या निमित्ताने : लोच्या झाला रे

Image
एक एप्रिलच्या निमित्ताने : लोच्या झाला रे एक एप्रिल हा लोकांना मूर्ख बनवायचा दिवस. "बुरा ना मानो होली है" या टाईपमध्ये या दिवशी मूर्ख बनवले तरी लोकं हसण्यावारी नेतात. माणसं खोटे बोलतात..सर्रास खोटं बोलतात.. कदाचित उत्क्रांतीमध्ये मानवाला भेटलेली ही देणगी असावी, फलनासाठी किंवा भोजनासाठी सजिवांमध्ये आपल्या प्रजातीबाहेरील प्राणी, कीटक यांना फसवण्याचे प्रकार संशोधनातून समोर आले आहेत. मात्र आपल्याच प्रजातीला फसवण्याचा मार्ग इतर सजीव सहसा अवलंबत नाहीत. मात्र काही लोकं खोटे बोलण्यात एवढे सराईत होतात, की आपण खोटे बोलत आहोत हे देखील त्यांना लक्षात येत नाही. राजकारणात तर लोक अपरिहार्यपणे खोटं बोलत असतात, प्रत्येकालाच सत्याचे प्रयोग करायला जमत नाही.. परंतु सर्रास खोटं बोलण्यासाठी, किंबहुना असत्य हेच हत्यार म्हणून वापरण्यासाठी निबर काळीज आणि पाठीमागे आयटीची फौज लागते. 😀   जेव्हा मोबाईल आले नव्हते आणि गावातील मोजक्याच लोकांकडे लँडलाईन असायची तेव्हा एप्रिल फुल करणं खूप सोप्प जायचं. माणसं सहज फसायची. अर्थात तो काळ वेगळा होता, ज्या काळात केवळ सणवार असतानाच ताटात श्रीखंड दिसायचं, मात्र...