झुरळ: काटकी कीटक, नाटकी कीटक

झुरळ: काटकी कीटक, नाटकी कीटक आपल्या पुराणात हनुमान, विभीषण, व्यास, कृपाचार्य, अश्वत्थामा, परशुराम, बळीराजा ही सात लोकं चिरंजीव मानली गेली आहेत. पृथ्वीच्या अंतापर्यंत ती जिवंत राहणार असे पुराण कथांमध्ये ठोकून दिले आहे. मात्र पृथ्वीच्या अंतापर्यंत मानव वंशातील कोणी राहील की नाही ते माहित नाही, झुरळ मात्र नक्की राहील. राहुल द्रविड सारखी भक्कम बचावप्रणाली असल्याने झुरळ वंश नाबाद राहण्याची शक्यता इतरांच्या तुलनेत सर्वात अधिक आहे. "ओगी अँड द कॉकरोचेस" हे कार्टून ज्यांनी पाहिले असेल त्यांना तर पक्के माहित असेल की आपण या झुरळांचे काहीच करू शकत नाही, त्यांचे सहअस्तित्व मान्य करूनच आपल्याला जीवन जगावे लागणार आहे. 🤪 सुमारे ३५ कोटी वर्षापूर्वीच्या झुराळाचे जीवाश्म सापडले आहे.. म्हणजे जेव्हा डायनोसोर या पृथ्वीवर गर्जत होते, तेव्हा त्यांच्या शेजारी झुरळ आपल्या मिशा परजत होते. डायनोसोरचा अंत या झुरळांनी आपल्या डोळ्यांनी पाहिला आहे, आणि तेव्हा कदाचित ते म्हणाले देखील असतील, "हमको मिटा सके, जमाने मे वो दम नही, हमसे जमाना है, जमाने से हम नाही." 😀 हिंदी डायलॉग वरून आठवले, हिंद...