ऑक्सिजन.. प्राणवायू

ऑक्सिजन.. प्राणवायू.. O2 मेरी सासोंमे बसा तेरा ही इक नाम.. माझ्याच काय सर्व प्राण्यांच्या श्वासात ऑक्सिजनच वसला आहे. हेनेगया सालमिनिकोला (Henneguya salminicola) हा जेलिफिशचा चुलतभाऊ सोडला तर प्रत्येक प्राण्याला जगण्यासाठी ऑक्सिजन आवश्यक असतोच. अद्याप तरी आपल्या महाराष्ट्रात ऑक्सिजनसाठी पैसे मोजावे लागत नाहीत. मात्र वायुप्रदूषणासाठी कुप्रसिद्ध असलेल्या दिल्लीमध्ये आज असे बार, पार्लर सुरू झाले आहेत, जिथे जाऊन तुम्ही ३०० रुपये देऊन १५ मिनिटे शुद्ध ऑक्सिजन घेऊ शकता. म्हणजे लवकरच ज्याला परवडेल, केवळ त्यांच्याच सेवेसाठी हा वायू तैनात असणार आहे. 😔 ओझोनचा थर फाटल्याचे देखील आपण ऐकत असतो.. असेच सुरू राहिले तर ऑक्सिजनवर अवलंबून असलेल्या जीवसृष्टीचे भवितव्य काय असेल?? आज डॉ. रिच्याच्या ओटी म्हणजे ऑपरेशन थिएटरमध्ये या ओटूला घेऊ. आपल्या पृथ्वीवरील वातावरणात नायट्रोजननंतर सर्वात जास्त, २१ टक्के ऑक्सिजन असल्याचे आपल्या सर्वांना माहीत असतेच.. मात्र या विश्वात देखील हेलियम हायड्रोजन नंतर ऑक्सिजन हाच तिसऱ्या क्रमांकावरील घटक आहे.😇 मात्र आपल्या सुर्यकुलात सजीवसृष्टीला पुरेल इतका प्राणवायू केवळ ...