भोंदू गिरी. पहिल्या धारेची

मुंबई लोकल मध्ये कायम असे पोस्टर लावून बंगाली बाबा आपल्या धंद्याची जाहिरात करत असतात. मला नाही वाटत यांना दिवसातून तीन चार पेक्षा जास्त कॉल येत असतील.. पण कॉल आला की त्याला बोलबच्चन टाकून बरोबर बाटलीमध्ये उतरवतात. 



भोंदू गिरीचा हा सगळ्यात खालच्या दर्जाचा प्रकार.. हातभट्टी दारू सारखा. इथे पण बरोबर वर्गवारी झाली आहे.  उच्च भ्रू वर्गासाठी जसे स्कॉच शॅम्पेन सारखी महागडी दारू असते.. तसे ओशो, रवी शंकर जग्गी वासुदेव सारखे अध्यात्मिक गुरु. दुसऱ्या फळी मध्ये ( रम व्हिस्की वगैरे) ज्यांना अध्यात्मिक भाषा समजत नाही.. त्यांची काही तरी अध्यात्मिक करायची खाज आसाराम, निर्मला माता, नरेंद्र महाराज सारखी मंडळी मिटवत असतात. तर ज्यांना चढणारी देशी दारू पाहिजे असते त्यांच्या साठी मग गल्लो गल्ली बुवा बाबा अम्मा लोक आहेतच कायम आहेच. 

साई बाबा भक्त वरच्या तीन ही स्तरामध्ये आढळतात.. आणि यांचा पेक्षा खालच्या स्तरावर असलेल्या ग्राहकाच्या सोयीसाठी या साईबाबांच्या अघोषित बेकायदा असलेल्या शाखा.  फोटोत आहे तश्या बंगाली बाबांच्या. साई बाबा चाच फोटो का.. तर हिंदू मुसलमान दोघांना पण capture करता येत हो..  येणाऱ्या नोटांवर थोडीच धर्म लिहिलं असतो. 

हे बंगाली बाबा येईल त्या ग्राहकाची पुरती वाट लावतात. आधी विश्वासात घेऊन समोर च्याची गुपित जाणून घेतात. नंतर काही विधी करण्यासाठी त्याला काही बाबी आणायला सांगतात किंवा काही क्रिया करायला सांगतात जे बेकायदेशीर असते. ग्राहक एकदा गुन्ह्यामध्ये अडकला.. की नंतर त्याची किती पण आर्थिक लुबाडणूक झाली तरी बोंब मारता येत नाही.  हीच यांच्या धंद्याची क्लृप्ती. लैंगिक शोषण वगैरे ची शक्यता पण इथे भरपूर.. आणि हे असे चालते हे आपल्या सगळ्यांना माहीत.

तरी पण काही बकरे यांना सापडतात राव.. मी बऱ्याच वेळा फोन करून यांची गम्मत घेत असतो. ह्यांना वाटते सापडला बकरा...  तुम्हाला पण असा किडा असेल तर तुम्ही पण घेत जा. इथे मुद्दाम नंबर खोडला आहे आणि फुली पण मारली आहे कारण जादुटोणा विरोधी कायदया नुसार तुम्ही चांगल्या प्रबोधनाच्या उद्देशाने जरी जाहिरात जशी च्या तशी पुढे पाठवली तरी तो गुन्हा ठरतो.. बाकी कीडे करायला तुम्हाला नंबर कुठे पण local मध्ये मिळून जाईल.


जाता जाता एक प्रश्न.. 

 शिरडी वाले साई बाबा हे गाणे यायच्या आधी ट्रेन मध्ये भिक मागताना कोणते गाणे गायले जायचे???


जो त्याचे उत्तर देईल त्याला साई बाबाचा दुर्मिळ खर्रा खुर्रा वरिजनल फोटू पाठवण्यात येईल😂😂


#richyabhau

#bangali black magic

Comments

  1. कमाल म्हणजे चक्क रेल्वे पैसे मिळवायला अश्या जाहिराती लावू देते

    ReplyDelete

Post a Comment