गणिताचा आनंद... सोमवार ते रविवार क्रम...
Dear maths.. please grow up.. and try to solve problem yourself.. why should I carry a burden of you.
लहान मुलाचा हा जोक तुम्ही ऐकला असेल नसेल.. पण गणित न आवडणारे खूप लोक आपल्या आसपास असतील..( कदाचित आरश्यात पाहिल्यावर पण दिसत असतील😂) पण रसेल सारख्या माणसाला ज्या विषयाने आत्महत्या करायला थांबवले असेल... तो विषय कंटाळवाणा कसा असेल...
शाळेत शिकवलेल्या सगळ्या विषयात हाच विषय आहे की तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जा, तुम्हाला खात्रीने साथ देत असतो. मात्र शाळेतले मास्तर (बाई पण बरका..) मारकुटे तरी असतील किंवा एरंडेल पिऊन आलेल्यागत चेहरा करून शिकवत असतील म्हणून बहुतेक पोरांचा नावडता विषय असतो गणित...
कालच्या पोस्ट वर उत्सुकतेने विचारले गेले की दिवसांची नावे कळाली पण हा सोम ते रवि क्रम यायला काही कारण आहे का..?? तर त्याचे उत्तर देखील गणितात मिळते.. हो... गणित आहे सगळीकडे.... जगात अंतिम सत्य काय असेल तर गणित आहे फक्त... उगाच नाय बर्ट्रांड रसेल बायका पोरांपेक्षा जास्त प्रेम करायचा गणितावर..
ग्रहांची नावे देताना क्रम ठरवताना आधी या ग्रहांच्या परिभ्रमण काळाची उतरत्या क्रमाने मांडणी केली गेली.... (अर्थात सुर्य आणि चंद्र हे ग्रह पकडले आहेत.. आणि पृथ्वी भोवती सारे जग फिरते हाच आधार घेवून) तर या ग्रहांना एक फेरी पूर्ण करायला खाली दिल्याप्रमाणे वेळ लागतो.
शनी ३० वर्ष
गुरु १२ वर्ष
मंगळ ६८७ दिवस
सुर्य ३६५ दिवस
शुक्र २२५ दिवस
बुध ८८ दिवस
चंद्र २९.५ दिवस
ज्या ग्रहाला एक फेरी पूर्ण करायला अधिक वेळ लागतो तो ग्रह मंद गती ( ए शनी.. तेरा साबण स्लो हे क्या😂) दिवसभराचे २४ भाग करून त्याला होरा (तास) असे नाव दिले. दिवसाच्या एका एका तासाचे पालकत्व एका एका ग्रहाकडे असते. दर तासाला मालक बदलतो. सूर्योदयाच्या वेळेस ज्या ग्रहाची मालकी सुरू असते, त्याचे नाव त्या दिवशीच्या वाराला मिळते..
आर्यभट्टाचा श्लोक आहे
आ मंदात शीघ्रपर्यंतम् होरेशा:
याचा अर्थ असा आहे की मंदगतीच्या ग्रहापासून शीघ्रगतीच्या ग्रहापर्यंत होरे सुरू असतात.
ग्रहांच्या गतीनुसार आपला चढता क्रम खालील प्रमाणे आहे.
शनी, गुरू, मंगळ, रवि, शुक्र, बुध, चंद्र.
शनीवारी पहिला होरा (एक तास) शनीचा, दुसरा गुरूचा, तिसरा मंगळाचा, चवथा रविचा, पाचवा शुक्राचा, सहावा बुधाचा, सातवा चंद्राचा. याप्रमाणे तीन् वेळा २१ होरे झाल्यावर २२वा पुन्हा शनीचा, २३वा गुरूचा, २४वा मंगळाचा येणार इथे दिवस पूर्ण होणार.. मग आता कुणाचा टर्न.. रविचा.. आला मग रविवार...( घ्या डबा मटण आणायचा🤣)
म्हणजे २४-२१=३ रोज तीन जागा सोडून पुढे असलेल्या ग्रहाला दुसऱ्या दिवशी स्वतचं नाव गाजवयाचा मान मिळणार.
सोबतच्या चित्रात आपण पाहू शकतो की शनी रवी चंद्र मंगळ बुध गुरू शुक्र आणि परत शनी हे तीन तीन घरांच्या अंतरावर आहेत. (करून बघा राव.. एवढे चांगले चित्र काढताना आधी तीन कागद खराब केले आहेत🤣)
तर सगळे ग्रह अश्या प्रकारे आठवड्यात आपापले मानाचे स्थान पटकावून बसले आहेत.. ही मांडणी एक शक्यता असू शकते.. असे ही असू शकते की नावे आधी आली आणि आर्यभट्टाने त्यातील गम्मत शोधून काढली.. काय का आसेना .. गणित आहे तर गम्मत आहे..
प्रेम करा गणितावर. आणि कुणाकडे आव्हानात्मक गणिती कोडे असेल तर टाका .. आनंद घेऊ सगळे गणिताचा😍🙏
Wa
ReplyDelete❤️🙏🏾
DeleteNice explanation....
ReplyDelete❤️🙏🏾✊✊
Delete