भेजा फ्राय..

 भेजा फ्राय.. 


सस्तन प्राण्यांची तुलना केल्यास असे दिसून येते की मानवी मेंदू आकारमानाने आणि वजनाने चिंपँझीच्या मेंदूच्या तिप्पट असतो. स्पर्म व्हेल च्या मेंदूचे वजन सुमारे ८ किलो असते, हत्तीच्या मेंदूचे वजन सुमारे ६ किलो असते.प्रौढ मानवी मेंदूचे सरासरी वजन १,३००-१,४०० ग्रॅ. असते.. म्हणजे डॉल्फिन माश्या एवढे. हत्तीला मानवापेक्षा जास्त बुद्धी आहे असा त्याचा अर्थ नाही. त्यासाठी शरीराचे वजन आणि मेंदूचे वजन याचे गुणोत्तर महत्त्वाचे असते. आणि या गुणोत्तर प्रमाणात मानव बाजी मारतो. 


प्राण्याचा एकूण शरीराचा आकार मोठा असेल, तर त्याच्या मेंदूचा आकारही मोठा असतो असं सामान्यपणे दिसून येतं. शरीराचा आकार मोठा तर एकूण कातडीची व्याप्ती मोठी. स्पर्शज्ञानासाठी लागणारी मज्जासंस्था मोठी लागणार. मोठं शरीर तर स्नायूही मोठे, त्यांची कार्यवाही करायलाही एकूण चेतातंतूंचं जाळं मोठ लागणार; पण एकूण शरीराच्या आकाराचं आणि मेंदूच्या आकाराचं गुणोत्तर सर्वांमध्ये सारखं नाही. शरीराच्या तुलनेत माणसाच्या मेंदूची तुलना केली, तर इथे मेंदूचे वजन व्यक्तीच्या शरीराच्या वजनाच्या सुमारे २% भरते. सोबत दिलेल्या आकृती मध्ये आपण पाहू शकता की इतर प्राण्यांचे हे गुणोत्तर किती आहे. 


ऑस्ट्रेलोपेथिकसच्या मेंदूचे वजन ३५०-४०० ग्रॅम्स होते. टप्प्या टप्प्याने मेंदूची उत्क्रांती होत होमोसेपियन्स या आधुनिक मानवाच्या मेंदूने १३५०-१४०० ग्रॅम्सचा पल्ला गाठला आहे. मेंदूच्या वाढीमध्ये लैंगिक निवड हे  प्रमुख कारण उत्क्रांती वादी शास्त्रज्ञ मांडतात. उत्क्रांतीच्या टप्प्यात अधिक मोठा मेंदू असलेल्या जोडीदाराची निवड होत गेली. त्याची गुणसूत्रे पुढच्या पिढीत संक्रामित होत गेली. तुलनेने लहान मेंदू असलेल्या मानवाला जोडीदार मिळाला नाही. त्याची गुणसूत्रे लुप्त पावली. हजारो वर्षाच्या या अविरत चक्रा मुळे आजची अवस्था गाठली आहे. 


इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, हैदराबाद यांनी केलेल्या एका संशोधनाची माहिती नुकतीच प्रसिद्ध झाली. भारतीय लोकांचा मेंदू हा लांबी-रुंदी-उंचीनं इतर युरोपियन (कॉकेशियन) किंवा अतिपूर्वेकडच्या कोरिया-चीनमधल्या लोकांच्या तुलनेत आकारानं लहान असतो, असा त्यातला निष्कर्ष होता. ( च्यामारी ह्या चायना च्या).. पण मेंदू चा पूर्ण वापर करणे ना त्यांना जमले आहे ना आपल्याला.. सो न्यूनगंड बाळगायचे कारण नाही . 


गम्मत म्हणजे मेंदूच नसणारेही काही जीव आहेत. मी भक्तांबाबत नाही बोलत आहे..🤣🤣 जेलिफिशच्या घंटाकार मुख्य शरीराचा आकार छोट्या एक मिलिमीटर व्यासापासून दोन मीटरपर्यंत मोठा असतो, त्याला जोडलेले लोंबणारे इतर अवयव सोडून; पण त्याला मेंदू नसतो! मेंदू नसणारे स्टारफिश, कोरल, समुद्र अर्चिन असे आणखीही काही प्राणी आहेत.. भक्तांनो तुम्ही एकटे नाही आहात. 🤣🤣


#richyabhau

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

आपली पुस्तके

गोमू आणि गोमाजीराव

शेंडी जाणवे आणि दाढी टोपी