एकांकिका : विज्ञानशलाका कमला

एकांकिका : विज्ञानशलाका कमला एकांकिका विज्ञान शलाका कमला पात्रे : १) कमला भागवत सोहोनी २) नारायणराव भागवत ३) सी वी रमण ४) श्रीनिवासय्या ५) स्वामी (शिपाई) ६) गुप्ता (आस्थापना अधिकारी) ७) डॉ सरस्वती ८) निवेदक : स्त्री असल्यास उत्तम. प्रवेश पहिला (प्रकाश व्यवस्था करणे शक्य असल्यास रंगमंचावर मध्यभागी प्रकाश पडतो.. आणि निवेदक दिसू लागते.) निवेदक : नमस्कार मंडळी.. आज आपण एका विज्ञानशलाकेची गोष्ट ऐकणार आहोत. कमला भागवत सोहोनी यांची... काय म्हणता… यांचे नाव कधी ऐकले नाही.. अहो या कमलाबाई म्हणजे विज्ञानात PhD मिळवणाऱ्या भारतातील पहिल्या महिला. अर्थात आपल्याकडे सिनेजगतातील तारकांना प्रसिध्दी मिळते, विज्ञानातील तारकांना नाही. कमलाबाईंचे स्थान तर सर्व तारकांमध्ये ध्रुवाप्रमाणे अढळ… तरीही आज नव्या पिढीला त्यांची माहिती नाही. म्हणून तर त्यांची कहाणी नव्याने सांगणे गरजेचे झाले आहे. आपण म्हणतो की सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीशिक्षणाची दारे खुली केली.. आणि स्त्रियांनी त्यांचे क्षितिज रुंदावत गगनी झेप घेतली. खरेच आहे.. मात्र आजही आपण एक गोष्ट विसरतो, भारतात...