निकोलाय वाविलोव्ह
निकोलाय वाविलोव्ह आणि त्याचे विज्ञाननिष्ठ सहकारी जेव्हा सत्तेवर मूर्ख व्यक्ती बसलेला असतो, त्यावेळी शास्त्राचे, विज्ञानाचे संदर्भ बदलले जातात.. आणि त्या नेत्याला सोईस्कर बोलणारे चमचे "तज्ज्ञ" म्हणून गणले जातात, सत्यापेक्षा सत्तेला प्रिय असलेली मांडणी केली जाते. सत्तेला अप्रिय ठरेल अशी शास्त्रीय परखड मांडणी करणारे लोक खड्यासारखे बाजूला केले जातात, प्रसंगी त्यांचा जीव घेतला जातो. मात्र विज्ञानासाठी जीवाची बाजी लावणारे अनेक वीर मानवी इतिहासात होऊन गेले, म्हणून तर आजवरचे विज्ञान विकसित होऊ शकले. ज्याप्रमाणे गॅलिलिओ, ब्रुनो यांनी विज्ञानाची कास न सोडता तत्वासाठी मरण पत्करले, त्याच पंक्तीत निकोलाय वाविलोव्ह तसेच त्याच्या सहकाऱ्यांचं नाव देखील घ्यावे लागेल. ✊ मानवाच्या इतिहासात दुष्काळ तसेच नैसर्गिक आपत्तींना अनेकवेळा सामोरं जावं लागलं.. मात्र अश्या आपत्तींना तोंड देतच कणखर व्यक्तिमत्वाची घडण होत असते. २७ तारखेला आपल्याला सोडून गेलेले सर्वांचे लाडके लेखक, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार अनिल अवचट यांची जडणघडण सत्तरीच्या दशकातील बिहारमधील दुष्काळ निवारण करतानाच झाली होती. निकोलाय...