मित्रतारा आणि ब्रेकथ्रू स्टारशॉट मिशन
मित्रतारा आणि ब्रेकथ्रू स्टारशॉट मिशन आज राष्ट्रीय विज्ञान दिवस.. विज्ञानधर्म मानणाऱ्यांचा आज सण. विज्ञान हाच खरंतर निसर्गनिर्मित धर्म आहे.. (बाकीचे सगळे धर्म मानवनिर्मित आहेत) फेब्रुवारी महिना सुरू झाला की विज्ञानधर्मियांना २८ फेब्रुवारीचे वेध लागतात. २८ फेब्रुवारी १९२८ रोजी सी. व्ही. रामन यांचा प्रकाशाच्या विकिरणाचा शोधनिबंध "नेचर" या विज्ञानविषयक मासिकात प्रसिद्ध झाला, पुढं रामन यांना त्यामुळं नोबेल पारितोषिक देखील मिळालं. रामन हे नोबेल पारितोषिक मिळालेले पहिली भारतीय व्यक्ती ठरले. १९८७ पासून २८ फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा होतो आहे. या विज्ञानाच्या सणानिमित्ताने होतो विज्ञानाचा जागर, प्रचार-प्रसार. ✊ अखिल मानवजातीवर उपकार केलेल्या या विज्ञानधर्माचे गोडवे गावे तितके थोडेच आहेत, तुम्ही विज्ञानधर्म मानत असाल किंवा नसाल, परंतु विज्ञानाला टाळून तुम्हाला जगता येणार नाही. विज्ञानाने निर्माण केलेली एकही गोष्ट न वापरता एक दिवस जगण्याची कल्पना करून पहा म्हणजे आपल्या लक्षात येईल की ही अतिशय अवघड बाब आहे. उत्क्रांतीमध्ये मानवाला काही विशेष देणग्या भेटल्य...