चंद्र आहे साक्षीला

चंद्र आहे साक्षीला आज सोमवती अमावस्या.. सोमवार हा चंद्राच्या वाट्याला आलेला वार आहे, त्या दिवशी जर अमावस्या असेल तर तिला सोमवती अमावस्या म्हणतात. यादिवशी अनेक ठिकाणी मोठा उत्सव साजरा केला जातो. मात्र चंद्राचा वार असून चंद्राचाच पत्ता नाही, त्याचा उत्सव का साजरा करायचा.. 😭 खरं तर सोमवती पौर्णिमा साजरी केली पाहिजे. आजवरच्या ग्रह, तारे, नक्षत्र, अधिक महिना,आठवड्याचे वार या सर्व पोस्टमध्ये चंद्र हा अविभाज्य भाग होताच आणि त्याच्या संदर्भातील पौराणिक कथांचा आपण उल्लेख केलेला आहेच. आज थोडी वेगळी माहिती घेण्याचा प्रयत्न करू या🙏🏾 चंद्र.. आपल्याला आकाशात दिसणारी सूर्यानंतरची सर्वात तेजस्वी वस्तू.. आणि आपल्या सूर्यमालेत आकाराने पाचव्या क्रमांकाचा असलेला उपग्रह. केवळ ३४७४ किमी व्यासाचा, म्हणजे ऑस्ट्रेलियापेक्षा लहान. काही शास्त्रज्ञांच्या मते हा आपल्या पृथ्वीचा जन्म झाला तेव्हापासूनचा जोडीदार.. तर काही शास्त्रज्ञ म्हणतात कि पृथ्वीला एका मोठ्या अंतरिक्षवस्तूची धडक झाली आणि त्यातून पृथ्वीचा हा टवका उडालेला आहे. चंद्र.. विविध संस्कृतीमधील पुराणकथांमध्ये अविभाज्य घटक, जगातील सर्व धर्मातील अन...