ऑनलाईन गणित शिकवणी

ऑनलाईन गणित शिकवणी.. फसवी जाहिरात ‼️


सध्या गणिताचे ऑनलाइन क्लासेसचे खूप फॅड निघाले आहे. स्वतः गणितामध्ये कच्चे असलेले पालक आपली मुलं गणितामध्ये हुशार व्हावी यासाठी खूप कॉनशस असतात, त्याचा फायदा घेऊन असल्या कलासची दुकाने चालतात.. आता सोबतच्या चित्रात तुम्ही पाहू शकता की वर्गमूळ काढण्याची किती सोपी पद्धत शिकवली आहे. केवळ सर्व अंकांची बेरीज करायची आणि त्यातून. दोन वजा करायचे की आले उत्तर . त्यांनी याची चार उदाहरणे देखील दिली आहेत. ५ चा वर्ग २५, ८ चा वर्ग ६४, १४ चा वर्ग १९६ आणि १७ चा वर्ग २८९, पालक विचार करतील की यार एवढे सोपे होते, मात्र आपल्याला कसे ठाऊक नव्हते. आणि या क्लासेस वाल्यांकडे अश्या किती आयडिया असतील..ते आपल्या पोरांना अश्या क्लासेस ला घालतात 

मात्र इथे चक्क हे क्लासवाले धूळ फेक करत आहेत. कारण ते जो सांगतात तो नियम नाही, योगायोग आहे, आणि तो केवळ चार ठिकाणीच लागू होतो. कोणताही नियम असा असतो, जो सर्व ठिकाणी लागू पडतो. इथे त्यांनी १९६ चे वर्गमूळ १४ कसे हे दाखवले आहे. मात्र १३ चा वर्ग असलेल्या १६९ मध्ये देखील तेच अंक असतात, तिथे क्लास वाले शिकवतात ती आयडिया लागू पडत नाही. थोडक्यात सांगायचे तर या क्लास ने शिकवलेली आयडिया फालतू आहे. मुलांनी या आयडिया लक्षात ठेऊन गणित सोडवले तर त्यांचे उत्तर इतर संख्यांच्या बाबत चुकणार आहे. 

हे केवळ एका क्लास च्या एका जाहिरातीचे उदाहरण दिले आहे..असे अनेक प्रकार सुरू आहेत. पालकांनी थोडे डोळे उघडे ठेवायची गरज आहे. 

Comments

Popular posts from this blog

आपली पुस्तके

दृष्टी तशी सृष्टी