कवी लोकांचा ताप...
कवी लोकांचा ताप...
मागच्या महिन्यात एका व्याख्यानाला गेलो होतो. आयोजकांपैकी एक कवी तिथल्या स्थानिक साहित्य परिषद शाखेचा पदाधिकारी होता. त्यानं माझं स्वागत करत त्याचा एक कवितेचं पुस्तक गिफ्ट दिलं. नंतर म्हणू लागला की तुमचं नवीन पुस्तक मला द्या.. मी त्याची छान समीक्षा करेल आणि तुम्हाला लिहून पाठवेल. मला अर्थातच त्याच्या समीक्षेची गरज नव्हती. मात्र मी काही म्हणायच्या आत त्यानं पुस्तक उचललं देखील आणि तो बाहेर गेला देखील.. 😭😭
मी माझं कोणतही पुस्तक कुणालाच मोफत देत नाही.. आणि जे जवळचे लोक आहेत ते देखील कधीच मोफत मागत नाहीत. अगदी जवळची मैत्रीण असेल तरी देखील तिला पुस्तक विकतच घ्यायला लावतो.🤭 याची दोन कारणं आहेत. १) पुस्तक विकत घेतलं असेल तर ते वाचलं जाण्याची शक्यता जास्त असते. २) लेखन हा एकमेव उद्योग करत असल्यामुळे मला पुस्तक मोफत देणं शक्य देखील नसतं.
त्यामुळे अशा मोफत मागणाऱ्या लोकांपासून मी सावध असतो. मात्र तरीही ही लोकं बरोबर खिंडीत गाठतात.. परवा असाच एक कार्यक्रम होता. एक कवयित्री तिथं भेटली आणि म्हणाली मला तुमचं कीटक पुस्तक हवंय. मी ओके म्हटलं. कार्यक्रम सुरू झाला. कार्यक्रम संपला तेव्हा ती पुन्हा माझ्या जवळ आली आणि म्हणाली हा माझा कवितासंग्रह.. तुम्हाला गिफ्ट. माझ्या डोक्यात भीतीची पाल चुकचुकली. ती म्हणाली मला कीटक द्या ना. मी चेंडू टोलवायच्या हिशोबाने म्हटलं की सोबत आलेल्या माझ्या मित्राकडे पुस्तकविक्री असते, त्याच्याकडून विकत घ्यावं लागेल. शिवाय माईकमध्ये देखील अनाउन्स केलं की ज्यांना माझी पुस्तकं हवी असतील त्यांना आज दहा टक्के सवलती मध्ये मिळतील
त्यानंतर ती त्या मित्राकडे गेली. ती म्हणू लागली की मला कीटक पुस्तक हवंय मित्राने किंमत सांगितली, ती म्हणू लागली की मला असंच द्यायला सांगितले आहे. मित्र म्हणाला, मी तुम्हाला शक्य तेवढा डिस्काउंट देऊ शकतो मात्र मोफत नाही. ती म्हणाली मी माझं पुस्तक त्यांना दिलं आहे, त्यांचं पुस्तक मी घेणार. माझ्याकडं वेळ नाहीये, मला लगेच जायचंय, पटकन द्या. तिची घाई पाहून हबकून गेलेल्या मित्रानं तिला पुस्तक दिलं. मॅडमनं ते पर्समध्ये ठेवलं आणि मस्तपैकी जेवणाच्या लाईनमध्ये उभ्या राहिल्या. 🤣🤣🤣
आता तिचा कवितासंग्रह माझ्या डोळ्यासमोर आहे. पान उघडण्याची देखील हिम्मत होत नाहीये. इथं त्याचा फोटो टाकला असता, पण मग माझी तुलना त्या कोकणामधल्या आंबेवालीशी झाली असती 🤣🤣 असो.. सांगायचं तात्पर्य असे अनेक कवितासंग्रह आज कपाटामध्ये आहेत. त्यांचे काय करावे असा प्रश्न आहे.. हे जर आपण कुणाला गिफ्ट दिले तर आपले संबंध खराब होण्याची शक्यता. 🤭 कुणाला हे कवितासंग्रह हवे असतील तर विनामूल्य घेऊन जावेत. मात्र या कविता वाचून डिप्रेशन आले तर मंडळ जबाबदार नाही😃
#richyabhau
Comments
Post a Comment