कांची नरक राजा
“कांची नरक राजा
” या तीन शब्दांचा एकमेकांशी काही संबंध आहे की नाही हे ठाऊक नाही, मात्र हे शब्द तुम्ही जर एखाद्या कागदावर दिले आणि हा कागद भिंतीवर चिकटवला तर म्हणे तुमच्या घरामध्ये पाली येत नाहीत.🤭
मागच्या आठवड्यात एका पात्राला भेटलो. २८ वर्षाची ही मुलगी वास्तुपंडित आहे, अंकपंडित आहे, समुपदेशक आहे. याशिवाय तिला केवळ पत्ता जरी दिला, तरी त्या घरामध्ये दोष आहे की नाही हे सांगण्याची तिची क्षमता आहे. आहे की नाही मल्टी टॅलेंटेड.. 🤣🤣 या सर्व गोष्टींचे तिने क्रॅश कोर्स देखील केले आहेत आणि आता इतरांना शिकवण्याची तिची तयारी सुरू आहे. बेसिक कॉलिफिकेशन फक्त बी.ए. आणि ब्रह्मकुळात जन्म. 🤭 या सर्व गोष्टींना जे किमान संवादकौशल्य हवं असतं, ते देखील तिच्याकडे नाही. तरी देखील ती मस्त दुकान मांडून बसली आहे.
आम्ही तिला भेटलो होतो एका वेगळ्या कामानिमित्त. ती बार्स विद्या देखील जाणते, या विद्येत तुमच्या डोक्याचे २८ बिंदू योग्य पद्धतीने दाबून दिल्यामुळे तुमचे सगळे टेन्शन निघून जाते. तुमचे डोके ४० मिनिटे दाबायचे केवळ २८०० रुपये घेतले जातात. मी जेव्हा हे सर्वात प्रथम ऐकले तेव्हाच मला यातील भोंदूपणा लक्षात आला. मात्र मी ज्या व्यक्तीसोबत गेलो होतो, त्या व्यक्तीला अनुभव घ्यायचाच होता. 😭 अर्थातच माझ्या अपेक्षेप्रमाणे ४० मिनिटे डोके दाबून घेऊन तिला काहीच फरक पडला नाही आणि २८०० रुपये मातीत गेले..
तर आम्ही ज्या ऑफिस कम दुकानामध्ये गेलो होतो, तिथे अनेक ठिकाणी कांची नरक राजा असे लिहिलेले कागद चिकटवले होते. याबाबत मी त्या पात्राला विचारलं. तर तिने खुलासा केला की असं लिहिलं तर पाली येत नाहीत आणि मला पालींची खूप भीती वाटते. 🤭 असं लिहिण्यामागे काय लॉजिक आहे असं तिला विचारलं. “ओ स्त्री तुम कल आना” टाईप हे काहीतरी असावं असं उत्तर तिने दिलं
मी तिला विचारलं की पाली वाचायला शिकल्या कधी, केवळ मराठीत लिहून चालतं की कन्नड तमिळ याच भाषा देखील पालीला समजतात, इतर प्राणी येऊ नयेत म्हणून असे काही मंत्र असतील तर ते सांगा आम्हाला. 😎 अर्थातच या कोणत्याही प्रश्नाचं तिच्याकडं समाधानकारक उत्तर नव्हतं.
तिच्याशी वेगवेगळ्या विषयावरती गप्पा मारल्या. (लोकांना शेंड्या लावायचा हा कॉन्फिडन्स येतो कुठून हे मला जाणून घ्यायचं होतं ) ज्या व्यक्तीसोबत तिचा गेलो होतो तिला देखील सांगितले की असे अनेक नवनवीन प्रकार येत राहतील तू काय सगळ्यांचे ट्राय करणार का?😃 हे सगळे उद्योग प्लासिबो इफेक्ट वर चालतात. आपण काहीतरी केलं आहे, बस एवढं समाधान ग्राहकांना हवं असतं. आणि जेवढे जास्त पैसे, तेवढे जास्त समाधान मानून घेतलं जातं. हे सगळं मी त्या पात्राच्या समोर तिला सुनावलं.
आम्ही गप्पा मारून बाहेर निघत होतो, (अर्थात मी तेवढे पीजे मारले होते) त्यावेळेस ती म्हणाली की तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं..मी तिला म्हणालो अर्थातच मी तुम्हाला त्याचे पैसे मागणार नाही.🤣🤣 ती फक्त हसली. कदाचित हा टोमणे समजून घेण्याची देखील तिची समज नव्हती.
Comments
Post a Comment