वर्गीस कुरियन.. द बेस्ट ऑफ इंडिया

वर्गीस कुरियन.. द बेस्ट ऑफ इंडिया❤️❤️❤️ समजा "क्ष" नावाच्या व्यक्तीचे स्वप्न असते काहीतरी.. मात्र त्याला घरचे नावडत्या क्षेत्रात टाकतात. परदेशातून शिकून आल्यावर त्याच्यावर एक वर्ष खेडेगावात काम करण्याची सक्ती करण्यात येते, जिथे तो दर महिन्याला राजीनामा देत असतो आणि राजीनामा नामंजूर होत असतो...सलग आठ महिने.. 😭 तर अशी व्यक्ती त्याला सोपवलेले काम किती प्रामाणिकपणे पार पाडेल? 🤔 "सहकारी संस्था" कश्या काम करतात हे आपल्याला माहीत आहेच. चेअरमनपद मिळवण्यासाठी कायकाय कुरापती केल्या जातात हे पण माहीत... पण केरळमध्ये जन्मलेली एक व्यक्ती गुजरात येथे स्थापन झालेल्या सहकारी संस्थेचा तब्बल तीस वर्ष चेअरमन बनते.. तेही बिनविरोध , एकमताने..😱 ही तीच "क्ष" नावाची व्यक्ती आहे.. कधीकाळी जिचा मारूनमुटकून "मारुती" केलेला.. "भारताचा मिल्कमन", ज्याचा जन्मदिवस "नॅशनल मिल्क डे" म्हणून साजरा केला जातो. ही व्यक्ती म्हणजे वर्गीस कुरियन.. ज्यांचे जन्मशताब्दी वर्ष आज पासून सुरु होत आहे. "देवभूमी" केरळमधील कोळ्हिकोड गावात ...