विज्ञान दिना निमित्त 🌄

विज्ञान दिना निमित्त 🌄 आज २८ फेब्रुवारी, राष्ट्रीय विज्ञान दिवस. सी व्ही रामन यांनी याच दिवशी आपला प्रसिद्ध रामन इफेक्टचा शोध प्रसिद्ध केला म्हणून देशभरात विज्ञान दिवस साजरा केला जातो. मात्र विज्ञान हे केवळ एका दिवसापुरते मर्यादित नसावे, ते आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपला अविभाज्य भाग असले पाहिजे. विज्ञानाच्या प्रत्येक टप्प्यावर धर्माशी त्याचा संघर्ष झालेला आहे, त्यात अनेक वैज्ञानिकांचे बळी गेलेले आहेत. आज विज्ञानाची सृष्टी आयती उपभोगत असताना यासाठी किती लोकांनी यासाठी खस्ता खाल्ल्या आहेत, रोषाचा सामना केला आहे याची जाणीव आपण ठेवली पाहिजे. . न्यूटन, आइनस्टाइन बद्दल नेहमीच बोलले जाते, मात्र काही कमी प्रकाशित तर काही पूर्णपणे उपेक्षित व्यक्तिमत्त्वांनी विज्ञानाच्या प्रवाहात योगदान दिले आहे. त्यांच्या आठवणींना उजाळा देताना आज वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार प्रसार करणे सुसंगत ठरेल. इतर भौतिक बाबींबाबत आग्रही असलेली अनेक मोठमोठी व्यक्तिमत्त्व वैज्ञानिक दृष्टिकोनासाठी आग्रही असताना दिसत नाहीत. एखादा मोठा व्यक्ती सेलेब्रिटी जेव्हा अंधश्रद्धेला बळी पडतो त्यावेळेस त्याचे अनुकरण इथं ख...