नरिंदर सिंह कपानी : फायबर ऑप्टिकचे जनक
नरिंदर सिंह कपानी : फायबर ऑप्टिकचे जनक आज संपूर्ण जग आणि त्यातील लोक, त्यांचा व्यापार इंटरनेटच्या माध्यमातून एकमेकांशी जोडलेला आहे. लोकांचे शिक्षण, मनोरंजन, एवढंच काय, रोजचं जगणं देखील इंटरनेटवर अवलंबून आहे. गॅस बुकिंग असो अथवा विद्युतबिल भरणा, प्रवासाचे नियोजन असो अथवा वस्तूंची खरेदी.. सर्वकाही घरबसल्या.. एकेकाळी या बाबींसाठी लाईन लावावी लागत होती, प्रचंड वेळ जात होता असं पुढच्या पिढीला सांगितलं तर त्यांना कदाचित खरं देखील वाटणार नाही. इंटरनेटमुळे आपल्या या अनुत्पादक दैनंदिन कामांमध्ये बदल झाला, या कामासाठी पूर्वी लागणाऱ्या वेळेत प्रचंड बचत झाली. आता हा वेळ अधिक सर्जनशील कामासाठी वापरता येऊ शकतो. (बहुतांश लोक सर्जनशील कामासाठी वापरत नाही हा भाग वेगळा😂) एकविसावं शतक हे वेगाचं शतक आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. एके काळी डायलअप कनेक्शनने ६४ kbps पेक्षा कमी इंटरनेटच्या वेगावर भागवायला लागायचं.. आता हा इंटरनेटचा वेग सामान्य ग्राहकाला देखील ३०० Mbps पर्यंत वेग उपलब्ध आहे. अमेरिकेतील ग्राहकांना तर इंटरनेटचा वेग Gbps मध्ये मिळू शकतो.. ही किमया साधली आहे फायबर ऑप्टिक या तंत्रज्ञानान...