Posts

Showing posts from October, 2025

डॉ. वाल्देमार हापकिन: मानवजातीचा रक्षक

Image
 डॉ. वाल्देमार हापकिन: मानवजातीचा रक्षक जानेवारी २०२५मध्ये जीबीएस आजाराचे रुग्ण आढळले आणि कोविडमध्ये दीड वर्षे होरपळलेल्या जनतेला पुन्हा एखादी नवीन महामारी आली की काय याचा धसका बसला. मात्र सुदैवाने जीबीएसचा प्रसार महामारी म्हणावी एवढा झाला नाही. आधुनिक वैद्यकशास्त्र जसजसं विकसित होत गेलं तसतसा मानवजातीचा अनेक महामारींशी लढा सुरू झाला. अर्थात त्यापूर्वी देखील या महामारी होत्याच, मात्र या आजारांचे कारण माहीत नसल्यामुळं त्यांना दैविकोप असं नाव दिलं गेलं. रेबीज, प्लेग, टायफॉइड, मलेरिया, कॉलरा, पिवळा ताप आणि गुप्तरोग यांनी आजवर जगभरात अब्जावधी लोकांचे बळी घेतले आहेत. हे आजार जंतूंमुळे होतात हे शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं आणि मानवजातीच्या रक्षणाचा लढा त्या दिशेनं सुरू झाला. या लढाईमधील सर्वात मोठा योद्धा असं आपण डॉ. वाल्देमार हापकिन यांना म्हणू शकतो. याच महा योद्ध्याने प्लेग आणि कॉलरा या शत्रुगोटातील प्रबळ महारथींना पराभूत केलं होतं म्हणून वाल्देमार हापकिन हे मानवजातीचे रक्षक ठरतात. डोंगराएवढे काम केलेल्या या माणसाला आज समाज विसरला आहे. त्याच्या मायदेशात अगदी त्याच्या जन्मगावी देखील त्या...

कवी लोकांचा ताप...

Image
 कवी लोकांचा ताप... मागच्या महिन्यात एका व्याख्यानाला गेलो होतो. आयोजकांपैकी एक कवी तिथल्या स्थानिक साहित्य परिषद शाखेचा पदाधिकारी होता. त्यानं माझं स्वागत करत त्याचा एक कवितेचं पुस्तक गिफ्ट दिलं. नंतर म्हणू लागला की तुमचं नवीन पुस्तक मला द्या.. मी त्याची छान समीक्षा करेल आणि तुम्हाला लिहून पाठवेल. मला अर्थातच त्याच्या समीक्षेची गरज नव्हती. मात्र मी काही म्हणायच्या आत त्यानं पुस्तक उचललं देखील आणि तो बाहेर गेला देखील.. 😭😭 मी माझं कोणतही पुस्तक कुणालाच मोफत देत नाही.. आणि जे जवळचे लोक आहेत ते देखील कधीच मोफत मागत नाहीत. अगदी जवळची मैत्रीण असेल तरी देखील तिला पुस्तक विकतच घ्यायला लावतो.🤭 याची दोन कारणं आहेत. १) पुस्तक विकत घेतलं असेल तर ते वाचलं जाण्याची शक्यता जास्त असते. २) लेखन हा एकमेव उद्योग करत असल्यामुळे मला पुस्तक मोफत देणं शक्य देखील नसतं.   त्यामुळे अशा मोफत मागणाऱ्या लोकांपासून मी सावध असतो. मात्र तरीही ही लोकं बरोबर खिंडीत गाठतात.. परवा असाच एक कार्यक्रम होता. एक कवयित्री तिथं भेटली आणि म्हणाली मला तुमचं कीटक पुस्तक हवंय. मी ओके म्हटलं. कार्यक्रम सुरू झाला....

कांची नरक राजा

Image
 “कांची नरक राजा ” या तीन शब्दांचा एकमेकांशी काही संबंध आहे की नाही हे ठाऊक नाही, मात्र हे शब्द तुम्ही जर एखाद्या कागदावर दिले आणि हा कागद भिंतीवर चिकटवला तर म्हणे तुमच्या घरामध्ये पाली येत नाहीत.🤭  मागच्या आठवड्यात एका पात्राला भेटलो. २८ वर्षाची ही मुलगी वास्तुपंडित आहे, अंकपंडित आहे, समुपदेशक आहे. याशिवाय तिला केवळ पत्ता जरी दिला, तरी त्या घरामध्ये दोष आहे की नाही हे सांगण्याची तिची क्षमता आहे. आहे की नाही मल्टी टॅलेंटेड.. 🤣🤣 या सर्व गोष्टींचे तिने क्रॅश कोर्स देखील केले आहेत आणि आता इतरांना शिकवण्याची तिची तयारी सुरू आहे. बेसिक कॉलिफिकेशन फक्त बी.ए. आणि ब्रह्मकुळात जन्म. 🤭 या सर्व गोष्टींना जे किमान संवादकौशल्य हवं असतं, ते देखील तिच्याकडे नाही. तरी देखील ती मस्त दुकान मांडून बसली आहे.  आम्ही तिला भेटलो होतो एका वेगळ्या कामानिमित्त. ती बार्स विद्या देखील जाणते, या विद्येत तुमच्या डोक्याचे २८ बिंदू योग्य पद्धतीने दाबून दिल्यामुळे तुमचे सगळे टेन्शन निघून जाते. तुमचे डोके ४० मिनिटे दाबायचे केवळ २८०० रुपये घेतले जातात. मी जेव्हा हे सर्वात प्रथम ऐकले तेव्हाच मला यातील भ...

रक्ताचा कर्करोग.

Image
 पुरोगामी जनगर्जना दिवाळी अंकासाठी कथा लिहिली आहे.  ====== रक्ताचा कर्करोग. सन २०४७...भारताला स्वातंत्र्य मिळून आज शंभर वर्षं झाली. ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून देशाचे पंतप्रधान आपलं ऐतिहासिक भाषण करत आहेत. आपल्या भाषणात ते सांगतात की, “या देशाच्या महान परंपरेचा गौरव अधिक वाढवण्यासाठी भारतीय संशोधन आणि उपचार नियंत्रण संस्थेचं बजेट दुप्पट करण्यात येत आहे. नकारात्मक ऊर्जा निर्माण करणाऱ्या लोकांना शोधण्यासाठी आणि त्यांचं शुद्धीकरण करण्यासाठी प्रज्ञा संरक्षण यंत्रणा विभागाचे अधिकार अधिक वाढवण्यात येत आहेत.  “ऊर्जा हा शब्द एखाद्या चलनी नाण्याप्रमाणं झाला आहे ना!” भाकरीचा तुकडा मोडताना चिन्मय म्हणतो. “मग काय!! आता तर म्हणे प्रत्येक गावात एक विशेष ऊर्जामंदिर देखील स्थापन करणार आहेत.” नाकावरचा चष्मा थोडा खाली घेत भार्गवी उत्तरते. बऱ्याच वेळाने चिन्मय काहीतरी बोलला याचंच तिला समाधान वाटलं होतं.  आर्यशीला गावातील प्रसिद्ध कुलकर्णी वाड्याच्या खिडकीत बसून चिन्मय न्याहारी करत होता. एकेकाळचा आंतरराष्ट्रीय कीर्तीचा हा रोबोटिक्स संशोधक अनेक वर्षं अमेरिकेत राहून आला होता. ४८ वर्षांच्या ...