ज्युलियन हक्सले : मानवतेचा प्रेमी ❤️

ज्युलियन हक्सले : मानवतेचा प्रेमी ❤️ सध्या उत्क्रांतीवादाला वाईट दिवस आले आहेत. शालेय अभ्यासक्रमातून त्याला वगळण्यासाठी सरकार आग्रही आहे. धर्माचे राजकारण करणाऱ्यांना उत्क्रांतीचे वावडे असणे स्वाभाविक आहे. कारण एकदा तुम्हाला उत्क्रांतीचे तत्व समजले की तुम्हाला कोणत्याही देव आणि धर्म संकल्पनेची गरज लागत नाही. सर्व मानवांचा पूर्वज एकच असल्याने वंश आणि प्रांतवादाच्या भिंती देखील गळून पडतात. उत्क्रांतीवाद आणि मानवतावाद यांना वेगळं काढता येत नाही. मानवता हेच जीवनासाठी आवश्यक सुंदर मूल्य समजत असलेला हा व्यक्ती इतर बंधने नाकारतो. आज आपण एका खानदानी उत्क्रांतीसमर्थकाची आणि मानवतावाद्याची ओळख करून घेणार आहोत. "खानदानी" यासाठी की आजोबा टी एच हक्सले यांनी देखील उत्क्रांतीचा हिरीरीने प्रचार केला आणि तोच वारसा ज्युलियन हक्सले यांनी देखील जपला. सर ज्युलियन साॅरेल हक्स्ले... एक शास्त्रज्ञ, एक लेखक, एक पक्षीनिरीक्षक, ऑस्कर विनिंग डॉक्युमेंट्री बनवणारा एक अवलिया.. एक युजीनिक्सवादी जो पुढील काळात मानवतावादी बनला, एक शिक्षणतज्ञ ज्याने प्राणिमात्रांच्या संवर्धनासाठी वर्ल्ड वाइ...