Posts

Showing posts from April, 2026

आपली पुस्तके

Image
आजवर प्रकाशित झालेल्या आपल्या सर्व पुस्तकांची माहिती इथे आहे. .    १) सायंटिस्ट खोपडी भाग २ :  जेन झी पासून रिव्होलुशनरी जनरेशन पर्यंत      लेखक : डॉ. नितीन हांडे  विषय : वेगवेगळ्या रंगात रंगलेल्या २१ शास्त्रज्ञांचे किस्से आणि त्यांनी लावलेले शोध यांची रंजक माहिती.. वैज्ञानिक दृष्टिकोनाचे वेगवेगळे पैलू मजेशीय पद्धतीने पुढे आणणारे हे पुस्तक.  न्यू इरा पब्लिकेशन. किंमत : ३५० रुपये. २) सायंटिस्ट खोपडी.. बेलपासून नोबेलपर्यंत.. लेखक : डॉ नितीन हांडे  विषय : वेगवेगळ्या रंगात रंगलेल्या २७ शास्त्रज्ञांचे किस्से आणि त्यांनी लावलेले शोध यांची रंजक माहिती.. वैज्ञानिक दृष्टिकोनाचे वेगवेगळे पैलू मजेशीय पद्धतीने पुढे आणणारे हे पुस्त क.  न्यू इरा प्रकाशन             किंमत ३००/- ३) पाथमेकर्स लेखक : डॉ. नितीन हांडे विषय : लिंगभेदाच्या अडथळ्यांवर मात करून स्त्री संशोधकांसाठी नवीन रस्ता निर्माण करणाऱ्या बारा स्त्री शास्त्रज्ञांची कहाणी सकाळ प्रकाशन. किंमत : २७०/- रुपये या पुस्तकाला मराठी साहित्य ...

ॲलन ट्यूरिंग : संगणक विज्ञानाचा शिल्पकार

Image
ॲलन ट्यूरिंग : संगणक विज्ञानाचा शिल्पकार दुसरं महायुद्ध सुरू झालं तेव्हा जर्मनीनं सर्व युरोपवर आपली पकड बनवली होती. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जर्मनी इतर सर्व देशांच्या पुढं होती. जर्मनीकडे साधी टायपरायटरसारखी दिसणारी इनिग्मा नावाची एक मशीन होती. युद्धामध्ये जर्मनी या मशीनचा वापर करून गुप्त संदेश पाठवत असे. हे संदेश इतके गुंतागुंतीचे होते की त्यांचे डीकोड करण्यासाठी अब्जावधी शक्यता पडताळून पाहावे लागतील. म्हणजेच शेकडो जणांची टीम वापरून एकेक शक्यता पडताळून हा संदेश उलगडण्यासाठी अनेक वर्षे लागतील. त्यामुळे जर्मनी अगदी निर्धास्त होती. मात्र माणसानं बनवलेल्या मशीनवर दुसरा माणूस नक्कीच मात करू शकतो ही बेसिक शक्यता जर्मनीच्या लक्षात आली नाही. इंग्लंडकडे असा माणूस होता, ज्यानं इनिग्मा कोड उलगडून आपली अनेक जहाजं वाचवली. महायुद्ध पूर्ण होईपर्यंत जर्मनीला समजलंच नाही की आपले सांकेतिक संदेश डीकोड झाले आहेत. त्यामुळं महायुद्ध दोन वर्ष आधी संपलं असं मानलं जातं. इंग्लंडला वाचवणारा हा सुपरमॅन होता ॲलन ट्यूरिंग!! आज आपण वापरत असलेले लॅपटॉप, मोबाईल, इंटरनेट या सर्वांच्या मागं काही मूलभूत कल्पना आहेत. त्...

जोसेफ लिस्टर : अँटिसेप्टिक शस्त्रक्रियेचे जनक

Image
 जोसेफ लिस्टर : अँटिसेप्टिक शस्त्रक्रियेचे जनक  वाल्देमार हापकिन यांना मानवतेचे रक्षक हे संबोधन सर्वात पहिल्यांदा लॉर्ड जोसेफ लिस्टर यांनी दिलं होतं हे आपण पाहिलं. मात्र स्वतः जोसेफ लिस्टर हे एक उत्तुंग व्यक्तिमत्व होतं. लंडनमधील रॉयल सोसायटीचं अध्यक्षपद भूषवणारी ही व्यक्ती सुरक्षित निर्जंतुक शस्त्रक्रियेची जनक मानली जाते. एकोणिसाव्या शतकात शस्त्रक्रिया करताना स्वच्छतेकडं फारसं लक्ष दिलं जात नव्हतं. ऑपरेशननंतर जखमांमध्ये पू होणे आणि संसर्ग होणे ही सामान्य गोष्ट होती. काही ठिकाणी तर पू होणं म्हणजे जखम बरी होत असल्याचं चिन्ह आहे असं मानलं जायचं. शस्त्रक्रियेनंतर अनेकवेळा रुग्णांचा मृत्यू होत असे. परंतु जोसेफ लिस्टर यांनी अँटिसेप्टिक पद्धत विकसित करून शस्त्रक्रिया अधिक सुरक्षित केली. त्यामुळं त्यांना अँटिसेप्टिक शस्त्रक्रियेचे जनक असं म्हटलं जातं.  भारतामध्ये सुश्रुताच्या काळापासून शस्त्रक्रियेची साधनं अग्नीनं तापवणं किंवा उकळणं, जखम स्वच्छ पाण्यानं किंवा औषधी द्रव्यांनी धुणं यासारख्या गोष्टी केल्या जात होत्या, त्यामुळं संसर्गाचं प्रमाण थोडं कमी व्हायचं. याच पद्धतीनं जगभर व...

होमी भाभा : भारतीय अणुऊर्जेचे जनक

Image
 होमी भाभा : भारतीय अणुऊर्जेचे जनक मार्च २०२६..हा महिना सुरू झाला तो इराण विरुद्ध इस्रायल आणि अमेरिका यांनी सुरू केलेल्या लढाईपासून. इराण दोन दिवसांमध्ये शरण येईल असं अमेरिका आणि इस्रायलला वाटलं होतं. मात्र हल्ल्यामध्ये प्रमुख नेत्यांची सर्व फळी मेल्यानंतर देखील इराणनं चिवट प्रतिकार करत अमेरिका आणि इस्रायलच्या नाकी नऊ आणले. हे युद्ध सुरू झालं कशावरून? अर्थातच तेल हे त्यामागचं महत्त्वाचं कारण असलं, तरी ते उघडपणे सांगता येत नाही. त्यामुळं इराण हा अण्वस्त्र सज्ज होण्याची तयारी करत आहे, ज्याचा जगाला धोका आहे असा नेहमीचा कांगावा अमेरिकेनं केला. असाच कांगावा करून त्यांनी इराण आणि इराकवर याआधी देखील हल्ले केले आहेत. मात्र आजपर्यंत या देशांचं कोणतंही अण्वस्त्र अमेरिकेला दाखवता आलं नाही. किंबहुना या देशांकडं अण्वस्त्र असतं, तर कदाचित अमेरिकेनं हल्ला देखील केला नसता. कारण उत्तर कोरियामध्ये किम जोंग कॅमेऱ्यासमोर अण्वस्त्र दाखवत अमेरिकेला खिजवतो, मात्र त्याच्याविरुद्ध काही कारवाई करण्याची हिंमत अमेरिका करत नाही.  यावरून आपण समजून घेऊ शकतो की एखाद्या देशाकडं अण्वस्त्र असणं किती महत्त्वाचं...

मेघनाद साहा : ताऱ्यांचे अंतरंग उघडणारा शास्त्रज्ञ

Image
 मेघनाद साहा : ताऱ्यांचे अंतरंग उघडणारा शास्त्रज्ञ  भारतातील एक शास्त्रज्ञ, ज्याला सात वेळा नोबेल पारितोषिकासाठी नामांकन मिळालं. मात्र नोबेल मिळू नाही शकलं. अर्थात लहानपणापासून उपेक्षा आणि संघर्ष याची सवय असलेल्या या शास्त्रज्ञाला त्याचा काही फरक पडला नाही. गरिबी आणि जातीव्यवस्थेचे चटके खात लहानाचं मोठ होणं, ब्रिटिशांविरोधी आंदोलनामध्ये भाग घेतल्यामुळं शाळेतून काढलं जाणं, मोठ्या संघर्षानंतर शिक्षण पूर्ण करण्याची संधी मिळणं.. मात्र त्यानंतरही सरकारी नोकरीमध्ये प्रवेश नाकारला जाणं हे सर्व काही त्याने सहन केले. आपत्ती मधून संधी शोधताना ही व्यक्ती संशोधनाकडं वळाली आणि भौतिकशास्त्रातील महत्त्वाचे शोध लावले. जगभरात उच्च पगाराची नोकरी मिळत असताना ही व्यक्ती भारतामध्ये येऊन आपलं योगदान देते. पुढे देश स्वतंत्र झाल्यावर अगदी खासदार होऊन संसदेत गरिबांचे प्रश्न मांडते. उणंपुरं ६३ वर्षांचं आयुष्य लाभलेले, आणि तरीही प्रचंड घडामोडीचं आयुष्य असलेले हे शास्त्रज्ञ म्हणजे मेघनाद साहा… मेघनाद साहा यांचं नाव कदाचित आपल्यापर्यंत आलं असेल ते केवळ शास्त्रज्ञ म्हणून.. मात्र स्वतंत्र भारताला दिशा देणार...