"द अमेझिंग" जेम्स रँडी

"द अमेझिंग" जेम्स रँडी "आज कुछ तुफानी करते है.." मनुष्य स्वभावातील साहसवेडाला साद घालून आपले प्रोडक्ट विकताना अनेक ब्रँड पाहिले आहेत.. जेम्स रँडी हा व्यक्ती नसून एक ब्रँडच .. नायगारा फॉल वर "खाली डोके वर पाय" करून टांगलेल्या, हात बांधलेल्या अवस्थेतून स्वतची सुटका करून घेणारा प्रयोग असो.. किंवा युरी गेलर, पिटर पॉपऑफ यांसारख्या भोंदूविरुद्ध दिलेला चिवट लढा... रँडीचे आयुष्य रोजच तुफानी होते... आपल्या ब्रँडपॉवरचा उपयोग करून त्यांनी भोंदूगिरीवर चांगला चाप बसवला.. विसावे शतक... जसे नव्यानव्या वैज्ञानिक शोधांनी गाजले त्याच वेळी पारलौकिक शक्तीचा दावा करणाऱ्या भोंदू बाबांचे देखील जगभर पेव फुटले होते.. दैवी उपचारांचा दावा, हातचलाखी किंवा विज्ञानाचा वापर करून लोकांची सर्रास फसवणूक होत होती. जगभरचे विवेकवादी याविरुद्ध लढा देऊ लागले.. या चळवळीत सुरुवातीच्या अब्राहम कोवूर, बी प्रेमानंद यांसारख्या शिलेदारांमध्ये जेम्स रँडी यांचे पण नाव घ्यायला लागेल. (पांढरी दाढी ही तिघांची पण ओळख.. 😀) एकाच वेळी ब्रँडपण आणि विचारवंत पण..... होय "द अमेझिंग" रँडी भा...