Posts

मिलेव्हाा मारीक (आईन्स्टाईन) : कालसापेक्ष उपेक्षित अबोली

Image
 मिलेव्हाा मारीक (आईन्स्टाईन) : कालसापेक्ष उपेक्षित अबोली. कहाणी १. एकोणीसावं शतक संपत असताना एका संस्थेमध्ये एक मुलगी गणित आणि शास्त्र शिकण्यासाठी दाखल होते. संपूर्ण वर्गामध्ये ती एकमेव महिला असते. शिक्षण घेत असताना एका सहाध्यायाच्या प्रेमात पडते, गर्भवती होते, त्यामुळे शिक्षणाकडं दुर्लक्ष होतं, आणि पदविका न मिळवता तिला बाहेर पडावं लागतं. ती त्या सहाध्यायाशी लग्न करते.. तिच्या आयुष्यात ती कधीच चमकलेली दिसत नाही, मात्र तिचा नवरा खूप मोठा शास्त्रज्ञ होतो. त्याच्यापासून वेगळे झाल्यानंतर पंधरा वर्षांनी ती दावा करते की नवऱ्याच्या संशोधनामध्ये माझंदेखील महत्त्वाचं योगदान आहे. मात्र तिचं बोलणं कोणीही गंभीरपणे घेत नाही.. कहाणी २. एक दिलफेक स्वभावाचा देखना, हुशार आणि व्हायलीन वगैरे वाजवणारा मुलगा.. थोडक्यात डीडीएलजे मधील आपला शाहरुख.. नुकतचं ब्रेक-अप झाल्यामूळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी धडपडणारा… शिक्षण घेण्यासाठी संस्थेमध्ये दाखल होतो, वर्गामध्ये असलेल्या एकमेव मुलीच्या मागे लागतो. ती मुलगी दिसायला साधारणच, मात्र प्रचंड बुद्धिमान. कदाचित या बुद्धिमत्तेच्या तेजानेच त्याचे डोळे ...

डॉ. शकुंतला थिलस्टेड : पौष्टिक शास्त्रज्ञ

Image
 डॉ. शकुंतला थिलस्टेड : पौष्टिक शास्त्रज्ञ पालन-पोषण हा शब्द आपण जोडूनच वापरतो. मात्र पालन आणि पोषण यामध्ये खूप अंतर आहे. एकीकडे सुबत्ता असताना मम्मीच्या हौसेखातर, समाधानाखातर बालकांना ठोसून ठोसून खायला घातलं जातं, मात्र त्या अन्नामध्ये पोषण असेलच असं नाही. 😞 पिझ्झा, बर्गर, मॅगी आणि मैदायुक्त पदार्थ खायला घालून घालून बालकाचं देखील मैद्याचं पोतं करून टाकतात. त्यांचे बाळ गुटगुटीत जरी दिसत असलं, तरी ते कुपोषितच असतं. दुसरीकडे अन्नाचं प्रचंड दुर्भिक्ष.. (हजारे अन्ना नाही.. ते सोयीने उगवतं, मावळत असतात) मुलं कुपोषित होतात यात पालकांचा नाईलाज असतो. रात्रंदिन काबाडकष्ट करून देखील हाताची आणि तोंडाची गाठ पडायची मुश्किल. भात भात करून प्राण सोडलेली मुलगी अजून आपल्या विस्मृतीत गेली नसेल.😞 जगातील ७० कोटी लोक आजही उपाशी झोपतात, दोन अब्ज म्हणजे जवळजवळ एक तृतीयांश व्यक्ती कुपोषित आहेत. या भुकेविरुद्ध आणि कुपोषणाविरुद्ध लढण्याचा शास्त्रज्ञांचा प्रयत्न सुरू आहे. आणि या लढ्यात भरीव कामगिरी करणार्यांना जागतिक खाद्य पुरस्काराने गौरवण्यात येतं. यावर्षी हा पुरस्कार भारतीय वंशाच्या डॉ. शकुंतला थिलस्टेड ...

ॲडा लव्हलेस : कॉम्प्युटर प्रोग्रॅमची जननी.

Image
 ॲडा लव्हलेस : कॉम्प्युटर प्रोग्रॅमची जननी.        ५ जून १८३३ चा दिवस. चार्ल्स बॅबेज, ज्याला आपण “कॉम्प्युटरचा पप्पा” म्हणतो, त्याच्या घरी पार्टी सुरु होती. पार्टीमध्ये सौंदर्य, बुद्धिमत्ता किंवा प्रतिष्ठा यापैकी कोणताही एक निकष पूर्ण करणाऱ्या व्यक्तींनाच निमंत्रित केलं होत. या पार्टीत एक १७ वर्षाची मुलगी आलेली असते. विशेष म्हणजे सौंदर्य, बुद्धिमत्ता आणि प्रतिष्ठा हे तीनही निकष तिच्याबाबत पूर्ण होत असतात. या पार्टीमध्ये आलेल्या पाहुण्यांना चार्ल्स बॅबेज आपलं बहुचर्चित “डिफरन्शीयल इंजिन” दाखवतो. आणि त्या इंजिनकडे सर्वात कुतूहलानं पाहणारी एकमेव व्यक्ती ती सतरा वर्षाची तरुणी असते. इथेच चार्ल्स बॅबेजला आपली शिष्या मिळून जाते.❤️ त्या तरुणीचं नाव होतं ॲडा लव्हलेस.. आपल्यापैकी बहुतेक जणांनी चार्ल्स बॅबेज हे नाव ऐकलेलं असतं, मात्र ॲडा लव्हलेस हे काहीसं अंधारात असलेलं नाव.. जाऊ द्या..शेक्सपियर म्हणून गेला आहेच की नावात काय आहे… इथं मात्र नावात एक गंमत आहे. ॲडा, जीचं बालपण लव्ह लेस होतं. आई बापाच्या प्रेमाविना जे करपून गेलं.. गावभर प्रेम वाटणारा बाप होता, तरी हिच्या वाट्य...

होरेस वेल्स आणि भुलभुलैय्या

Image
होरेस वेल्स आणि भुलभुलैय्या पु. ल. देशपांडे यांचे एक वाक्य आठवते, "मला तथाकथित अवतारी पुरुषांपेक्षा, ज्या व्यक्तीने भूल देण्याचे औषध शोधून काढले त्याचा आदर वाटतो" खूप महत्त्वाचं वाक्य आहे. बुवा, बापू, अम्मा, फेकू इत्यादी मंडळी केवळ शब्दाचे बुडबुडे उडवतात, ऐकताना काही क्षण मानवाला दिलासा मिळतो. पण ना दुःख कमी होते ना वेदना..😔 मानवाच्या आयुष्यातील वेदना कमी करण्याचं खूप मोठं काम भूलतज्ञ आणि प्रतिजैविकं यांनी केलं आहे. मात्र नायट्रस ऑक्साईड हा वायू जगाच्या वेदना शमऊ शकेल असा शोध ज्या शास्त्रज्ञाने लावला, त्याच्या हयातीमध्ये त्याला याचं क्रेडिट कधीच मिळालं नाही. शेवटी स्वतःच्या मानसिक वेदना शमवण्यासाठी त्याला मृत्यूचा आधार घ्यावा लागला.😭 भूल देऊन शस्त्रक्रिया करण्याची सोय नव्हती तेव्हा कसं होत असेल याची आपण कल्पना देखील करू शकणार नाही. युद्धामध्ये जखम झाली की सैनिकांना प्रतिजैविकाअभावी गॅंगरीन व्हायचा, आणि तो भाग काढून टाकला नाही तर जीवावर बेतायचं. आणि तो भाग काढून टाकताना होणाऱ्या वेदना... त्या कोण सहन करणार, त्यापेक्षा लोकं मृत्यू पत्करायची.‌ सन ११९९ मध्ये इंग्...

ज्युलियन हक्सले : मानवतेचा प्रेमी ❤️

Image
ज्युलियन हक्सले : मानवतेचा प्रेमी ❤️ सध्या उत्क्रांतीवादाला वाईट दिवस आले आहेत. शालेय अभ्यासक्रमातून त्याला वगळण्यासाठी सरकार आग्रही आहे. धर्माचे राजकारण करणाऱ्यांना उत्क्रांतीचे वावडे असणे स्वाभाविक आहे. कारण एकदा तुम्हाला उत्क्रांतीचे तत्व समजले की तुम्हाला कोणत्याही देव आणि धर्म संकल्पनेची गरज लागत नाही. सर्व मानवांचा पूर्वज एकच असल्याने वंश आणि प्रांतवादाच्या भिंती देखील गळून पडतात. उत्क्रांतीवाद आणि मानवतावाद यांना वेगळं काढता येत नाही. मानवता हेच जीवनासाठी आवश्यक सुंदर मूल्य समजत असलेला हा व्यक्ती इतर बंधने नाकारतो. आज आपण एका खानदानी उत्क्रांतीसमर्थकाची आणि मानवतावाद्याची ओळख करून घेणार आहोत. "खानदानी" यासाठी की आजोबा टी एच हक्सले यांनी देखील उत्क्रांतीचा हिरीरीने प्रचार केला आणि तोच वारसा ज्युलियन हक्सले यांनी देखील जपला.   सर ज्युलियन साॅरेल हक्स्ले... एक शास्त्रज्ञ, एक लेखक, एक पक्षीनिरीक्षक, ऑस्कर विनिंग डॉक्युमेंट्री बनवणारा एक अवलिया.. एक युजीनिक्सवादी जो पुढील काळात मानवतावादी बनला, एक शिक्षणतज्ञ ज्याने प्राणिमात्रांच्या संवर्धनासाठी वर्ल्ड वाइ...

होजे डेलगाडो : वेडा मानसोपचारतज्ञ

Image
होजे डेलगाडो : वेडा मानसोपचारतज्ञ भारतामध्ये आयटी नियम २०२१ लागू करण्यात आले आहेत, ज्याद्वारे वेबपोर्टलवरील बातम्यांवर डायरेक्ट शासनाचे नियंत्रण येणार आहे. वेबपोर्टल वरील हवे ते कन्टेन्ट काढून टाकण्यात किंवा त्यामध्ये बदल करण्याचे अधिकार शासनाला म्हणजे पर्यायाने बाबूलोकांना असणार आहेत. द वायरचे संस्थापक त्याविरोधात न्यायालयात देखील गेले आहेत. टीव्हीवरील तर जवळपास सर्वच चॅनल सरकारचीच वकिली करत असतात. लोकांची डोकी बथ्थड करायचा कारखाना जोरात सुरू आहेच ना. 😭अर्थात तिथे केवळ भक्त बळी पडतात.. मग त्याऐवजी असे केले तर...🙄 सरकारने सरसकट सर्व जनतेचं प्रोग्रामिंग केले तर.😬😬 आजपासून ५० वर्षापूर्वी एका शास्त्रज्ञाने मानवी मेंदूचे प्रोग्रामिंग करता येते असा दावा करून खळबळ उडवून दिली होती. केवळ मानवी मेंदू नाही तर प्राण्यांच्या मेंदूवर देखील त्याने अनेक यशस्वी प्रयोग केले होते. नैतिक अनैतिकची, मानवतेची व्याख्या बदलली, मानसिक रुग्णांवर उपचार करताना काहीसे अघोरी वाटणारे, वैज्ञानिक परिभाषेत बसतील असे अभिनव प्रयोग केले. मात्र सनसनाटी निर्माण करत असले तरी वैद्यकीय जगात त्याच्या प्रयोग...