Posts

हेडी लॅमार : वैज्ञानिक अभिनेत्री

Image
हेडी लॅमार : वैज्ञानिक अभिनेत्री अभिनेत्र्या आणि त्यांची सुमार बुद्धिमत्ता यावर आपण आजवर अनेक विनोद ऐकले असतील. या अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या असतात अशी पुरूषी मानसिकता त्यामागे असेल. काही वर्षांपूर्वी आलिया भटच्या विनोदांचा तर खूपच मोठा ट्रेण्ड चालला. मात्र मला तर ती खूपच समजदार पोरगी वाटत आली आहे. (आताही रणवीर सिंगच्या फोटोशूट प्रकरणात तिने अतिशय विवेकी भूमिका घेतली आहे.) आपल्या सिनेसृष्ठीतील स्मिता पाटील, शबाना आझमी, दीप्ती नवल यांसारख्या सकस अभिनेत्र्या त्यांच्या विद्वत्तेसाठी आणि सामाजिक भानासाठी प्रसिद्ध आहेतच. "बुद्धी असेल तर सौंदर्य नाही, सौंदर्य असेल तर बुद्धी नाही" अश्या पुरूषी म्हणींना चपराक देणाऱ्या या अभिनेत्र्या. 😘   मात्र अभिनय आणि संशोधन या दोन्ही क्षेत्रात अचाट कामगिरी करणाऱ्या हेडी लॅमारने सर्व तारकांपेक्षा आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ❤️ आज वाय-फाय आणि ब्ल्यू टूथ हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाले आहेत. मात्र या तंत्रज्ञानाचा शोध या अभिनेत्रीने लावला आहे. अशी अभिनेत्री, जिला या पृथ्वीतलावरची सर्वात सुंदर स्त्री असं संबोधलं जायचं. ऑस्कर फॉर इन...

डास दडूनी राहतो

Image
डास दडूनी राहतो कामावरून दमून आल्यानंतर रात्री तुम्हाला कधी एकदा पाठ टेकवता असं झालेलं असतं. घशाखाली कसेबसे दोन घास टाकून तुम्ही बेडरूममध्ये प्रवेश करता. मोठा दिवा बंद करून छोटा दिवा लावता आणि आपल्या पलंगावर जाता. अशावेळी आपल्या जोडीदाराने काय तरी रोमँटिक गुणगुणावं असं तुम्हाला वाटत असतं.😍 तुम्हाला गुणगुण ऐकू येते मात्र ती रोमँटिक नसते तर धडकी भरवणारी असते. काही सेकंद आधीच तुम्ही बेडरूममध्ये "मच्छर नाही ना" हे पाहिलेलं असतं तेव्हा तो दिसलेला नसतो. कारण "डास दडूनी राहतो, वाट संधीची पाहतो." आणि आता त्याला वाटते हीच ती वेळ, हाच तो क्षण.. चलो पार्टी करे 🤪  तुम्ही या गुणगुणीकडे दुर्लक्ष करण्याचं नाटक करता. तुम्हाला माहित असतं, की बेडरूममध्ये आणखी एक व्यक्ती आहे, कदाचित डास तिकडं जाईल. किंबहुना तो डास तिकडं जावा अशी तुम्ही मनापासून प्रार्थना करत असता. तुम्ही स्वतःच्या मनाची समजूत काढत असता की हा मच्छर तुम्हाला चावणार नाही. मात्र हे खोटं ठरतं. तुमच्या जोडीदाराकडं ढुंकून देखील न पाहता हा मच्छर तुमच्या शरीराचा ताबा घेतो आणि आपलं प्रेमपत्र तुम्हाला पोचवतो. आता त्याचा...

वसंत खानोलकर: भारतातील पॅथॉलॉजीचे जनक

Image
वसंत खानोलकर: भारतातील पॅथॉलॉजीचे जनक कुष्ठरोग, प्रजननशास्त्र, अनुवंशशास्त्र आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कर्करोग या विषयांमध्ये पायाभूत संशोधन करणारे डॉ खानोलकर हे भारतात झालेल्या आरोग्यविज्ञानाच्या प्रगतीमधील एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व.. व्हीआर सर या लघुनावानं प्रसिद्ध असलेल्या खानोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रज्ञांच्या कैक पिढ्या घडल्या. अनेक नव्या संस्थांची पायाभरणी खानोलकर यांच्या पुढाकाराने आणि मार्गदर्शनाखाली झाली आहे. कर्करोगाचं प्राथमिक अवस्थेत निदान असो अथवा तंबाखूमध्ये कर्करोगाचा प्रादुर्भाव करण्याची क्षमता, या बाबींच्या संशोधनामध्ये त्यांचं संशोधन मैलाचा दगड ठरलं आहे. अशा थोर व्यक्तिमत्त्वाची ओळख पुढच्या पिढीला व्हावी म्हणून आजचा लेख. 🙏🏾  वसंत रामजी खानोलकर यांचा जन्म कोकणातील एका छोट्या खेडेगावात गोमंतक मराठा समाजातील एका सुशिक्षित कुटुंबात एप्रिल १८९५ रोजी झाला. गोमंतक मराठा समाजाला नूतन मराठा समाज असंही म्हणतात. या समाजाने कला क्षेत्रासोबतच विज्ञान क्षेत्रात देखील अनेक मोठी नावं दिली आहेत. मात्र खानोलकर यांचे घराणं खूपच ऐतिहासिक.. एवढं ऐतिहासिक आहे की आजही ...

चंद्र आहे साक्षीला

Image
चंद्र आहे साक्षीला आज सोमवती अमावस्या.. सोमवार हा चंद्राच्या वाट्याला आलेला वार आहे, त्या दिवशी जर अमावस्या असेल तर तिला सोमवती अमावस्या म्हणतात. यादिवशी अनेक ठिकाणी मोठा उत्सव साजरा केला जातो. मात्र चंद्राचा वार असून चंद्राचाच पत्ता नाही, त्याचा उत्सव का साजरा करायचा.. 😭 खरं तर सोमवती पौर्णिमा साजरी केली पाहिजे. आजवरच्या ग्रह, तारे, नक्षत्र, अधिक महिना,आठवड्याचे वार या सर्व पोस्टमध्ये चंद्र हा अविभाज्य भाग होताच आणि त्याच्या संदर्भातील पौराणिक कथांचा आपण उल्लेख केलेला आहेच. आज थोडी वेगळी माहिती घेण्याचा प्रयत्न करू या🙏🏾  चंद्र.. आपल्याला आकाशात दिसणारी सूर्यानंतरची सर्वात तेजस्वी वस्तू.. आणि आपल्या सूर्यमालेत आकाराने पाचव्या क्रमांकाचा असलेला उपग्रह. केवळ ३४७४ किमी व्यासाचा, म्हणजे ऑस्ट्रेलियापेक्षा लहान. काही शास्त्रज्ञांच्या मते हा आपल्या पृथ्वीचा जन्म झाला तेव्हापासूनचा जोडीदार.. तर काही शास्त्रज्ञ म्हणतात कि पृथ्वीला एका मोठ्या अंतरिक्षवस्तूची धडक झाली आणि त्यातून पृथ्वीचा हा टवका उडालेला आहे. चंद्र.. विविध संस्कृतीमधील पुराणकथांमध्ये अविभाज्य घटक, जगातील सर्व धर्मातील अन...

महिन्यांची नावं कुठून आली?

Image
महिन्यांची नावं कुठून आली? जानेवारी, फेब्रुवारी आणि सोमवारी, मंगळवारी.. लहानपणी दोन्हीचा काही संबंध असेल असं वाटायचं. पण क्रमवार आणि सहावार, नववार यामधल्या वारांचा जसा एकमेकांशी काही संबंध नाही त्याच पद्धतीनं आठवड्याच्या वारांचा जानेवारी, फेब्रुवारी या महिन्यांच्या नावाशी काहीच संबंध नाही.. खरं तर महिन्याच्या नावांमध्ये जानेवारी फेब्रुवारी हे दोन महिने निर्वासित आहेत, कदाचित म्हणूनच त्यांचं वेगळेपण आहे. त्याआधी, जेव्हा दहा महिन्याचं वर्ष पकडलं जायचं, हे दोन महिने आणि त्यांची नावं अस्तित्वात नव्हती. तेव्हा नवीन वर्ष मार्च महिन्यापासून सुरू व्हायचं. 😳   होय.. मार्च महिन्यापासून सुरू झालेल वर्ष डिसेंबर महिन्यात संपायचं. आणि त्यापुढच्या काळात कडक थंडी असल्यामुळं पुढचे दिवस सोडून दिले जायचे. त्यांच्याकडे आधी ८ दिवसाचा आठवडा होता.. आणि ३८ आठवड्याचे वर्ष. ३८*८ म्हणजे केवळ ३०४ दिवस होते का वर्षात?? नाही... वर्ष ३६५ दिवसाचेच होते, तरी बाकीचे ६१ दिवस हे चक्क सोडून दिलेले असायचे. कारण युरोपात एवढी कडाक्याची थंडी पडायची की दैनंदिन व्यवहार ठप्प झालेले असायचे. आता देखील नाताळ म्ह...

डॉ. कमल रणदिवे

Image
डॉ. कमल रणदिवे आणि त्यांचे कर्करोगावरील संशोधन. कर्करोग.. नुसतं नाव जरी घेतलं की ऐकणाऱ्याच्या काळजात धस्स होतं, एवढी या रोगाची दहशत. कदाचित त्यामुळेच अनेक वेळा त्याला केवळ सीए या लघुरूपानं संबोधलं जातं. इसवीसन पूर्व १६०० मध्ये पहिल्या स्तनाच्या कर्करोगाचे निदान झाल्याची नोंद आढळते. २५०० वर्षांपूर्वी हिप्पोक्रेस्टस या प्रसिद्ध ग्रीक वैद्याने सर्व प्रकारच्या कर्करोगांची यादी केली होती. भारतात सुमारे २८०० वर्षांपूर्वी रचलेल्या चरक आणि सुश्रुत संहितेमध्ये कर्करोगाचे उल्लेख आढळतात. पूर्वी कर्करोग व्हायचं प्रमाण कमी होतं, मात्र गेल्या दोन शतकांमध्ये जगभरामध्ये कर्करोगाचा फैलाव खूपच वेगाने झाला आहे. त्याची भीषणता वाढत आहे, दर वर्षी सुमारे दोन कोटी रुग्ण या खेकड्याच्या तावडीत सापडत आहेत. 😔   अनेक वर्ष कर्करोग हा एक उत्तर नसलेला प्रश्न होता.. मात्र विज्ञान विकसित होत गेलं आणि शास्त्रज्ञ या प्रश्नाचं उत्तर शोधायला भिडले. लवकर निदान झालं तर कर्करोग बरा होऊ लागला, केमोथेरपी, रेडिएशन सर्जरी आणि टारगेट थेरपी यांच्या संयुक्त उपचारांनी कर्करोगावर मात करता येऊ शकते. कर्करोगावर संशोधन करणा...