Posts

वासरे.. संवत्सरे

Image
वासरे.. संवत्सरे पंचांगामध्ये अशा काही गोष्टी दिलेल्या असतात की जे आपल्याला खूप गूढ वाटतात. मात्र त्यामध्ये गूढ असं काहीच नसते, असते फक्त गणित. काही हौशी लोकांनी लग्नाच्या पत्रिकेत भौमवासरे वगैरे शब्द वापरलेले असतात. आपल्या हातात पत्रिका आली की आपण फक्त लग्नाची तारीख, स्थळ आणि वेळ पाहतो, तो विषय क्लिअर झाला की बाकी आपल्याला फक्त जेवणाच्या वेळेशी मतलब असतो. त्यामुळे हे भौम वासरे वगैरे काय आहे याचा प्रश्न आपल्याला पडत नाही. असेल बाबा एखादा गोभक्त.. आणि लग्नामध्ये एखादा वासरू बांधलं असेल, आपल्याला काय घेणं!! वासरे म्हणजे दुसरे तिसरे काही नसून वार याचाच समानार्थी शब्द आहे. अनेक वेळा भौम् वासरे देखील लिहिलेले असते आणि पुढे मंगळवार पण दिलेले असते. हे म्हणजे लेडीज महिला असं म्हटल्यासारखे द्विरुक्तीचे उदाहरण झाले मात्र साध्या सोप्या गोष्टी जरा कॉम्प्लिकेटेड केल्या तरच ज्योतिषी मंडळीची हुशारी लोकांना दिसेल ना!! भानुवासरे किंवा आदित्यवासरे(रविवार), इंदुवासरे(सोमवार), भौमवासरे(मंगळवार), सौम्यवासरे(बुधवार), बृहस्पतीवासरे(गुरुवार), भृगवासरे(शुक्रवार), मंदवासरे(शनिवार) अशी आठवड्यातील वारांची नाव...

मधमाशी : टू बी ऑर नॉट टू बी

Image
मधमाशी : टू बी ऑर नॉट टू बी "या पृथ्वीवरून मधमाश्या जर नाहीशा झाल्या तर पुढील चार वर्षांमध्ये मानववंश देखील संपलेला असेल" असं अल्बर्ट आईन्स्टाईन सांगतो.. या वाक्यामध्ये जरा देखील अतिशयोक्ती नाही, कारण मानवाला मिळणाऱ्या अन्नधान्यांपैकी ७० टक्के धान्य मधमाशांद्वारे होणाऱ्या परागसिंचनामुळे तयार होत असते, गाई म्हशींच्या चाऱ्यापैकी ८० टक्के गवत मधमाशांच्या परागसिंचनामुळे जन्माला येते. कपाशीच्या उत्पादनात देखील मधमाशांची महत्वाची भूमिका असते. थोडक्यात सांगायचे तर मधमाशा नसतील तर "खानेको रोठी नय मिलेगा, पेहननेको कपडा नय मिलेगा." म्हणूनच आजवर मानवाव्यतिरिक्त इतर कोणत्या सजीवाचा सर्वात जास्त अभ्यास झाला असेल तर तो सजीव आहे मधमाशी!! मधमाशीबद्दल उपलब्ध माहितीच्या प्रचंड मोठ्या साठ्यातून काही परागकण आपल्यासाठी आज वेचत आहे..   या मधमाश्या पृथ्वीतलावर कधी आल्या असाव्यात? १५ कोटी वर्षांपूर्वीच्या मधमाशीचे जीवाश्म सापडले आहे. सर्व प्राचीन संस्कृतीमध्ये औषध आणि अन्न म्हणून मधाचा वापर केलेला आढळतो. इजिप्शियन संस्कृतीमध्ये मृतदेह टिकवण्यासाठी देखील मधाचा वापर केलेला दिसतो. ९००० वर्...

मुंगी: मानवाची प्रतिस्पर्धी

Image
मुंगी: मानवाची प्रतिस्पर्धी होय.. मुंगी मानवाची प्रतिस्पर्धी आहे, कारण वसाहत करणे, आपल्या सोयीसाठी दुसरे प्राणी पाळणे यासारख्या बुद्धिमान म्हणता येईल अशा गोष्टी मुंगी करत असतेच. मुंग्या सर्वात बुद्धिमान कीटक म्हणून ओळखल्या जातात. काही शास्त्रज्ञ तर असे म्हणतात की मेंदू आणि पूर्ण शरीराचे वजन यांच्या गुणोत्तराचा विचार करता मुंग्या या पृथ्वीवरील सर्वात बुद्धिमान प्राणी आहेत. 😳 उत्तर आफ्रिकेत असे समजले जाते की मानवाने शेती करून धान्य जमवणे तसेच घर बांधणे या बाबी मुंगीकडून शिकल्या आहेत. मुंग्या एका ठिकाणी साठविलेले अन्न दुसरीकडे नेताना दिसू लागल्या की लवकरच पाऊस येणार असा अंदाज ग्रामीण भागात बांधला जातो. एक ना हजारो गोष्टी.. अंटार्क्टिका आणि इतर बर्फाळ प्रदेश वगळता पूर्ण पृथ्वी व्यापणाऱ्या मुंग्यांची काही वेगळी माहिती आज आपण घेऊया.❤️  सुमारे १४ कोटी वर्षांपासून, म्हणजे डायनोसोर नामशेष झाले त्या कालखंडाच्या आधीपासून मुंग्या या पृथ्वीतलावर आपले शिस्तबध्द आयुष्य जगत आहेत. दोन लाख वर्षांपूर्वी पैदा झालेल्या बुद्धिमान मानववंशाच्या विविध संस्कृती, धर्म ग्रंथ, लोककथांचा आणि मुंगळा मुंगळा सा...

गॅरी कास्पारोव्ह: ६४ घरांपलीकडचे व्यक्तिमत्त्व

Image
गॅरी कास्पारोव्ह: ६४ घरांपलीकडचे व्यक्तिमत्त्व १३ एप्रिलला गॅरी कास्पारोव्हचा साठावा वाढदिवस झाला.. या बुद्धिबळ खेळातील जागतिक विश्वविजेत्याची ओळख ६४ घरांमध्ये त्याने केलेल्या पराक्रमापुरती मर्यादित नाही, किंबहुना तसे असते तर त्यावर लेख लिहायची मी तसदी देखील घेतली नसती. आपण कोणत्याही ऐऱ्यागैऱ्या वर थोडीच लिहीतो, मग या ग्याऱ्या वर आज का लिहीत असेल? कारण बुद्धिबळातील जागतिक अव्वल स्थानावर तब्बल २५५ महिने राहण्याचा विक्रम करणारा गॅरी त्याच्या लोकशाही, मानवी अधिकारांसाठी झपाटून काम करत आहे, प्रसंगी पुतीनसारख्या हुकुमशहाशी पंगा घेत आहे. रशियन हुकूमशाहीला विरोध करणाऱ्या अनेक विचारवंतांचा गूढ मृत्यू कसा होतो हे आपण वर्तमानपत्रात नेहमी वाचत असतो. अशा पार्श्वभूमीवर बुद्धिबळ खेळात अफाट पैसा कमावून सुखाचे आयुष्य जगण्यात ऐवजी गॅरी का विनाकारण सत्ताधीशांना आव्हान देत असतो हे समजावून घ्यायला हवे ना!!   सोव्हिएत संघराज्यातील अझरबैस्तान राज्याच्या राजधानीमध्ये, बाकू या शहरामध्ये गॅरी चा जन्म १३ एप्रिल १९६३ रोजी झाला. वडील किम वेनस्टेन हे ज्यू तर आई क्लारा कास्पारोव्हा ही आर्मेनियन. दोघेही इं...

ढेकणाचे संगें.. ढेकणाचे बाजे

Image
ढेकणाचे संगें.. ढेकणाचे बाजे काही वर्षांपूर्वी स्लमडॉग मिलेनियर या चित्रपटाच्या संगीताला ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. जय हो गाण्यासाठी हा पुरस्कार मिळाल्याचे तुम्ही ऐकले असेल. पण मी सांगतो हे खोटे असणार… परीक्षकांना त्या चित्रपटातील दुसरे एक गाणे जाम आवडले असणार.. रिंग रिंग रींगा.. या गाण्यात ढेकणाने एका ललनेशी केलेले लगट आणि तेव्हा तिने सोडलेले कामुक सुस्कारे याचे वर्णन गुलझार आणि रेहमान जोडीने असे केले आहे की त्यांना ऑस्कर मिळाले त्यात काहीच नवल नाही… मात्र आपण आंबटशौकीन आहोत असे जगासमोर जायला नको म्हणून परीक्षक मंडळींनी जय हो या गाण्याला पुढे केले अशी ढे कूनकून मला लागली आहे. 😎   ढेकणाचे संगें हिरा जो भंगला । कुसंगे वाढला साधू जैसा ॥ भावे तुका हा सत्संग हा बरा । कुसंग हा फेरा चौर्यांशीचा ॥ झुरळ किंवा मच्छर या प्राचीन किटकांपेक्षा अध्यात्मात ढेकूण बऱ्याच अधिक वेळा दर्शन देतो आणि भाव खाऊन जातो. कारण जगातील सर्वात कठीण पदार्थ असलेल्या हिऱ्याला देखील ढेकूण भंग करू शकतात अशी त्यांची महती आहे. असे म्हणतात की हिरा आणि ढेकूण हे एका डब्यात काही दिवस ठेवले तर त्या काळात ढेकूण हि...

झुरळ: काटकी कीटक, नाटकी कीटक

Image
झुरळ: काटकी कीटक, नाटकी कीटक आपल्या पुराणात हनुमान, विभीषण, व्यास, कृपाचार्य, अश्वत्थामा, परशुराम, बळीराजा ही सात लोकं चिरंजीव मानली गेली आहेत. पृथ्वीच्या अंतापर्यंत ती जिवंत राहणार असे पुराण कथांमध्ये ठोकून दिले आहे. मात्र पृथ्वीच्या अंतापर्यंत मानव वंशातील कोणी राहील की नाही ते माहित नाही, झुरळ मात्र नक्की राहील. राहुल द्रविड सारखी भक्कम बचावप्रणाली असल्याने झुरळ वंश नाबाद राहण्याची शक्यता इतरांच्या तुलनेत सर्वात अधिक आहे. "ओगी अँड द कॉकरोचेस" हे कार्टून ज्यांनी पाहिले असेल त्यांना तर पक्के माहित असेल की आपण या झुरळांचे काहीच करू शकत नाही, त्यांचे सहअस्तित्व मान्य करूनच आपल्याला जीवन जगावे लागणार आहे. 🤪 सुमारे ३५ कोटी वर्षापूर्वीच्या झुराळाचे जीवाश्म सापडले आहे.. म्हणजे जेव्हा डायनोसोर या पृथ्वीवर गर्जत होते, तेव्हा त्यांच्या शेजारी झुरळ आपल्या मिशा परजत होते. डायनोसोरचा अंत या झुरळांनी आपल्या डोळ्यांनी पाहिला आहे, आणि तेव्हा कदाचित ते म्हणाले देखील असतील, "हमको मिटा सके, जमाने मे वो दम नही, हमसे जमाना है, जमाने से हम नाही." 😀 हिंदी डायलॉग वरून आठवले, हिंद...

राहू केतू आणि बुद्धीला ग्रहण

Image
राहू केतू आणि बुद्धीला ग्रहण सूर्यग्रहण असो अथवा चंद्रग्रहण, त्यांच्या निमित्ताने जेवढी अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रयत्न करता येईल तेवढा भारतात सर्व भाषेतील न्यूज चॅनल्स मनोभावे करतातच. काही महिन्यांपूर्वी एका न्यूज चॅनलला तर असं दाखवलं की एका इंग्रजी महिन्यामध्ये दोन चंद्रग्रहणे येत आहेत, तर नक्कीच अशुभ काळ सुरू होणार आहे. खरंतर अंधश्रद्धा आणि दहशत पसरवल्याबद्दल अशा चॅनलवर कारवाई व्हायला हवी. सूर्यग्रहण असो अथवा चंद्रग्रहण, त्यामागे केवळ गणित असते. आणि ते गणित आपल्या पूर्वजांना हजारो वर्षापूर्वीच चांगले माहीत झाले होते. मात्र आज एकविसाव्या शतकात जेव्हा प्रसिध्दीमाध्यमातील प्रतिनिधी त्यांचे अज्ञान प्रदर्शित करत असतात, तेव्हा त्यांची कीव येते. राहू केतू हे राक्षस असून खरच सूर्य चंद्राला गिळतात असेही कदाचित त्यांना भविष्यात वाटेल.. खरं तर त्यांच्या बुद्धीला ग्रहण लागलेलं असतं.😭😭   आकाशस्थ ग्रहगोलांचा अभ्यास अगदी अचूकपणे करण्याची परंपरा हजारो वर्षांपासून चालू आहे. त्यामुळे भविष्यातील ग्रहणे कोणत्या तारखेला किती वाजता येणार आहेत, ती कुठून दिसणार आहेत हे आपण अगदी अचूकपणे सांगत असत...