Posts

असीमा मुखर्जी चॅटर्जी

Image
असीमा मुखर्जी चॅटर्जी : आणि त्यांची असीम कामगिरी xx गुणसूत्रे घेऊन जन्म झालेली व्यक्ती असो किंवा xy.. व्यक्तीच्या कर्तुत्वाला या गुणसूत्रावरून निसर्गानं बंधनं घातली नाहीत, समाजानं घातली आहेत. हे आजच्या काळातही खरे आहे की xy गुणसूत्रे घेऊन तुम्ही जन्माला आला असाल, तर तुम्हाला तुमचे कर्तुत्व दाखविण्याची अधिक संधी मिळते, अजूनही xx गुणसूत्रे असलेल्या बहुतेक व्यक्तींना आपल्या स्वतंत्र अस्तित्वाची लढाई करावी लागते. त्यातील काहीच ही लढाई जिंकतात. अशा या लिंगभेद करणाऱ्या समाजात शंभर वर्षापूर्वी जन्मलेल्या स्त्रीची कहाणी जाणून घेऊ, विज्ञानाच्या पुरुषप्रधान क्षितिजावर महिलांचं वेगळं स्थान निर्माण करून जी अजरामर झाली आहे.  जी भारतीय विज्ञान काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष होती. भारतीय विद्यापीठामध्ये विज्ञान क्षेत्रात डॉक्टरेट मिळवलेली ही पहिली महिला. पद्मभूषण असीमा मुखर्जी चॅटर्जी, सेंद्रिय रसायनशास्त्रात केलेल्या असीम करणारी ही विदुषी, ज्यांनी शोधलेली औषधे कर्करोग, फिट येणे, हिवताप यावरील उपचारासाठी वापरली गेली, काही आजही वापरली जातात. भारताचं नोबेल पारितोषिक समजलं जाणारं शांतीस्वरूप ...

मुक्ती पथे… 

Image
मुक्ती पथे…   एक रस्ता.. आणि त्या रस्त्यावरून एक चिमणी उडत आली.. तिला माहित आहे की हा रस्ता मुक्तीचा रस्ता आहे.. तिने खूप ऐकले होते या रस्त्याबाबत, खूप अवघड वाटचाल असते म्हणे त्याची. आज मनाचा हिय्या करून चिमणी निघाली त्या रस्त्यावर.. पण हे काय??? थोडेच अंतर कापून झाले, रस्ता सरळसरळ आलेला मात्र आता समोर वळण दिसत आहे, आणि नेमके त्याच ठिकाणी एक चेक पोस्ट..  एक रखवालदार कावळा तिथं बॅरिकेड्स लावून आणि हातात काठी घेऊन बसलेला. काळा कोट घातलेला, धारदार चोच असलेला कावळा.. चिमणी उडत बागडत बॅरिकेड्स जवळ येते.. "अग ये चिमणे, कुठं चालली आहेस?" "मला ना त्या मुक्तीच्या रस्त्यावर जायचे आहे. जाऊ द्या ना मला" "अग हो पण या रस्त्यावर तुला मी जाऊ देणार नाही, वरून ऑर्डर आहे तुला सोडायचे नाही म्हणून" "ते काही नाही मला जायचे म्हणजे जायचे म्हणजे जायचेच आहे." "नाही म्हणजे नाही म्हणजे नाही." "मी काही लेचीपेची नाही, नव्या युगातील चिमणी आहे, माझा हक्क मी मिळवणारच, मी पाहतेच कोण मला अडवतय."  हातातील दंडुका आपटत कावळा म्हणतो," तुला एकदा सांगितले ना...

मित्रतारा आणि ब्रेकथ्रू स्टारशॉट मिशन

Image
मित्रतारा आणि ब्रेकथ्रू स्टारशॉट मिशन आज राष्ट्रीय विज्ञान दिवस.. विज्ञानधर्म मानणाऱ्यांचा आज सण. विज्ञान हाच खरंतर निसर्गनिर्मित धर्म आहे.. (बाकीचे सगळे धर्म मानवनिर्मित आहेत) फेब्रुवारी महिना सुरू झाला की विज्ञानधर्मियांना २८ फेब्रुवारीचे वेध लागतात. २८ फेब्रुवारी १९२८ रोजी सी. व्ही. रामन यांचा प्रकाशाच्या विकिरणाचा शोधनिबंध "नेचर" या विज्ञानविषयक मासिकात प्रसिद्ध झाला, पुढं रामन यांना त्यामुळं नोबेल पारितोषिक देखील मिळालं. रामन हे नोबेल पारितोषिक मिळालेले पहिली भारतीय व्यक्ती ठरले. १९८७ पासून २८ फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा होतो आहे. या विज्ञानाच्या सणानिमित्ताने होतो विज्ञानाचा जागर, प्रचार-प्रसार. ✊   अखिल मानवजातीवर उपकार केलेल्या या विज्ञानधर्माचे गोडवे गावे तितके थोडेच आहेत, तुम्ही विज्ञानधर्म मानत असाल किंवा नसाल, परंतु विज्ञानाला टाळून तुम्हाला जगता येणार नाही. विज्ञानाने निर्माण केलेली एकही गोष्ट न वापरता एक दिवस जगण्याची कल्पना करून पहा म्हणजे आपल्या लक्षात येईल की ही अतिशय अवघड बाब आहे. उत्क्रांतीमध्ये मानवाला काही विशेष देणग्या भेटल्य...

रुचिराम साहनी : "द नेटिव्ह" शास्त्रज्ञ

Image
रुचिराम साहनी : "द नेटिव्ह" शास्त्रज्ञ . वैज्ञानिक झालं म्हणजे वैज्ञानिक दृष्टी लाभली असं नाही, त्यामुळेच विज्ञानाच्या क्षेत्रात देखील गुणी शास्त्रज्ञांवर वेळोवेळी अन्याय करणारा लिंगवाद, वंशवाद, प्रांतवाद आपल्याला पाहायला मिळतो. एक शास्त्रज्ञ अहवालात आपले काही निष्कर्ष ठामपणे मांडतो, ज्यामुळे लाखो लोकांचे जीव वाचतात. मात्र नेटिव्ह लोकांना श्रेय कशाला द्यायचे? वरिष्ठांकडून त्यांचं श्रेय हिरावून घेतलं जातं, त्या घटनेच्या अहवालामध्ये रुचिराम साहनी यांचं नावदेखील नसतं. कारण ते नेटीव्ह असतात. अर्थात या बाबीकडे दुर्लक्ष करून साहनी आपलं काम सुरू ठेवतात.. आणि काळाला या नेटिव्ह शास्त्रज्ञाच्या बुद्धीमत्तेची दखल घ्यावीच लागते.✊   एक भारतीय व्यक्ती भौतिकशास्त्र, हवामानशास्त्र यांसारख्या विषयांवर आपला ठसा उमटवते. पुरावनस्पतीशात्राचा पाया घालते, अणूशास्त्रामध्ये महत्वाचं योगदान देणाऱ्या रुदरफोर्ड सोबत संशोधन करून संशोधनपत्रिका प्रसिद्ध करते.‌ भारतातील डायनोसोरच्या जीवाश्मावर संशोधन करते. भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये सक्रिय सहभाग घेते, त्या सोबतच विज्ञानाच्या प्रसाराची चळवळ हिरीरीने...

बाप रे बाप.. 😬

Image
बाप रे बाप.. 😬 उद्या जगासाठी व्हॅलेंटाईन डे असेल.. मात्र आम्हा सनातनी मंडळीसाठी मातृपितृ दिवस आहे..🚩 कारण आमच्या संस्कृतीनं आम्हाला शिकवलं आहे की आईबापासाठी पोरानं त्याग करायचा असतो… आज आमचे पूज्य आसाराम बापू जरी कारागृहात आहेत, तरी त्यांची सेवा करायला नारायण साई स्वतः कारागृहात गेले आहेत. याला म्हणायंच बापावर प्रेम.. बापाचं ऐकून वनवासात गेलेल्या रामापेक्षा बापासोबत जेलमध्ये जाणारा नारायण साई हा पितृभक्तीचं आदर्श उदाहरण आहे.🥳 धन्य तो बाप आणि धन्य तो पुत्र.. आज या निमित्तानं जगभरातील पुराणकथात अजरामर झालेल्या पितापुत्रांची ओळख करून घेऊया. 😇   असं म्हणतात की मुलाचा जीव त्याच्या आईवर असतो आणि मुलीचा जीव तिच्या बापावर… आई आणि मुलीमध्ये सुप्त स्पर्धा असते तर बाप आणि मुलांमध्ये देखील चुरस सुरू असते. याला ओडीपस कॉम्प्लेक्स असंही म्हणतात. (काही लोक इडीपस असं देखील म्हणतात) किशोरवयीन मुलांना बाप हा डोक्याला ताप वाटत असतो. तरी हल्ली बापमंडळी खूप खेळकर झाली आहेत. पोरांना समजावून घेणं आणि त्यांचे हट्ट पुरवणं किती शांतपणे करत असतात.. कुटुंबं छोटी होत चालली आहेत, बहुतेक घरात एकच कि...

नील देशमुख : आश्वासक युवासंशोधक

Image
नील देशमुख : आश्वासक युवासंशोधक "जगाच्या कोणत्याही भागात राहणाऱ्या प्रत्येक मानवाला चांगलं आयुष्य जगता येईल, यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून हे जग बदलणं हे माझं स्वप्न आहे, मला हा बदल घडवायचा आहे." हे वाक्य आहे नील नितीन देशमुख या युवासंशोधकाचं. हे वाक्य त्यानं उच्चारले तेव्हा त्याचं वय होतं अवघं सोळा वर्षं. किशोरवयीन मुलांमध्ये हा नेहमीचा समज असतो की "जेव्हा जेव्हा पृथ्वीवर काही संकट येतं, तेव्हा मानवाला वाचवायला कोणी सुपरहिरो किंवा दैवीशक्ती समोर येत असते." मात्र याच वयोगटातील नील देशमुखला हे ठाऊक असतं की आजच्या संगणकयुगात कोणती दैवीशक्ती असेल तर ती आहे 'कृत्रिम प्रज्ञा'. ❤️   मानवाच्या प्रत्येक अवघड, किचकट कामांमध्ये आपण कृत्रिम प्रज्ञेचा वापर केला पाहिजे यासाठी नील आग्रही असतो. आज नील प्लांटम कृत्रिम प्रज्ञा क्षेत्रातील उद्योजक आणि तज्ज्ञ व्याख्याता तर आहेच, याशिवाय त्याचं स्वतंत्र संशोधनदेखील सुरू आहे. आजच्या तरुण पिढी पुढं नील सारखे आदर्श मांडले पाहिजेत.. थेरगाव क्वीनच्या फालतू संवादाचे व्हिडिओ मोठ्ठ्या संख्येने व्हायरल होतात, हिंदुस्तानी भाऊ सारख्य...

निकोलाय वाविलोव्ह

Image
निकोलाय वाविलोव्ह आणि त्याचे विज्ञाननिष्ठ सहकारी जेव्हा सत्तेवर मूर्ख व्यक्ती बसलेला असतो, त्यावेळी शास्त्राचे, विज्ञानाचे संदर्भ बदलले जातात.. आणि त्या नेत्याला सोईस्कर बोलणारे चमचे "तज्ज्ञ" म्हणून गणले जातात, सत्यापेक्षा सत्तेला प्रिय असलेली मांडणी केली जाते. सत्तेला अप्रिय ठरेल अशी शास्त्रीय परखड मांडणी करणारे लोक खड्यासारखे बाजूला केले जातात, प्रसंगी त्यांचा जीव घेतला जातो. मात्र विज्ञानासाठी जीवाची बाजी लावणारे अनेक वीर मानवी इतिहासात होऊन गेले, म्हणून तर आजवरचे विज्ञान विकसित होऊ शकले. ज्याप्रमाणे गॅलिलिओ, ब्रुनो यांनी विज्ञानाची कास न सोडता तत्वासाठी मरण पत्करले, त्याच पंक्तीत निकोलाय वाविलोव्ह तसेच त्याच्या सहकाऱ्यांचं नाव देखील घ्यावे लागेल. ✊  मानवाच्या इतिहासात दुष्काळ तसेच नैसर्गिक आपत्तींना अनेकवेळा सामोरं जावं लागलं.. मात्र अश्या आपत्तींना तोंड देतच कणखर व्यक्तिमत्वाची घडण होत असते. २७ तारखेला आपल्याला सोडून गेलेले सर्वांचे लाडके लेखक, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार अनिल अवचट यांची जडणघडण सत्तरीच्या दशकातील बिहारमधील दुष्काळ निवारण करतानाच झाली होती. निकोलाय...