जेम्स बॅरी.. चाचा ४२० डॉक्टर
जेम्स बॅरी.. चाचा ४२० डॉक्टर भारतातील पहिली महिला डॉक्टर कोण?? यावर आपल्याकडे नेहमी वाद होतात. आनंदीबाई जोशी, रखमाबाई राऊत यांच्या बरोबरीने कादंबरी गांगुली यांचे नाव देखील घेतले जाते. पण "जगातील" पहिली महिला डॉक्टर कोण.. असे विचारलं तर सहसा आपल्याला माहीत नसते.. अलेक्सा, सिरी, गुगलअसिस्टंट यांना विचारले तर एलिझाबेथ ब्लॅकवेल यांचे नाव सांगितले जाईल.. मात्र हे खरे नाही. जगातील पहिली महिला डॉक्टर आहे जेम्स बॅरी एखाद्या व्यक्तीचे आयुष्य सिनेमातील कथेपेक्षा रोमांचक असू शकेल याचे उत्तम उदाहरण म्हणजे जेम्स बॅरी... स्वतःचे स्त्रीत्व लपवून, पुरुष बनून मेडिकल कॉलेजला एडमिशन मिळवले, नंतर ५६ वर्ष प्रॅक्टिस केल्यानंतर जेव्हा तिचा मृत्यू झाला तेव्हा तिचे स्त्रीत्व बाकीच्यांना कळले... आपण सिनेमामध्ये अनेक वेळा स्त्री पुरुष एकमेकांच्या वेशात येताना पाहिलं असेल (खर तर लिंगबदलाचा मेकओव्हर एवढा फालतू असतो की शेंबडे पोरग पण ओळखेल.. 😭) मात्र जेम्स ५६ वर्ष स्त्रीत्व लपवून पुरुष बनून राहिला... आणि मृत्यूनंतर एक दंतकथा बनून. हे खरे की पहिल्या नोंदणीकृत महिला डॉक्टर एलिझाबेथ ब्लॅकवेल याच...