Posts

पुस्तकावरील प्रतिक्रिया

Image
आजवर प्रकाशित झालेल्या आपल्या सर्व पुस्तकांना वाचकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यातील काही वाचकांनी आपली प्रतिक्रिया पाठवली होती..  

कृमीविवर.. अवकाशातील बोगदा

Image
 कृमीविवर.. अवकाशातील बोगदा रुमालाची घडी घालून ज्या पद्धतीनं आपण त्याची दोन टोकं एकत्र किंवा जवळ आणू शकतो, तसं अंतराळात शक्य आहे का? अवकाशातील अंतरं प्रचंड मोठी आहेत. अगदी आपल्या दीर्घिकेच्या म्हणजे आकाशगंगेच्या दोन टोकांमध्ये एवढे अंतर आहे की ते पार करण्यास प्रकाशाला पंचवीस हजार वर्षे लागतात. आणि अश्या अब्जावधी दीर्घिका अवकाशात आहेत. हे अंतर मानवाला कधीच पार करता येणार नाही का या प्रश्नानं शास्त्रज्ञांना भेडसावलं आहे, मात्र त्यावर कदाचित कृमीविवर हे उत्तर असेल. कृमीविवर म्हणजे अवकाशातील बोगदा!!  ज्याप्रमाणं एखादा किलोमिटरचा बोगदा काढला तर वीस पंचवीस किलोमिटरचा घाटरस्ता टाळता येतो, तसंच इथंदेखील होऊ शकतं. बांद्रा ते वरळी हे अंतर निम्मं करण्यासाठी ज्या पद्धतीनं आता नवीन सागरीसेतू तयार केला आहे, तसंच वर्महोल अर्थात कृमीविवर असेल अशी कल्पना शास्त्रज्ञ गेल्या शंभर वर्षांपासून करत आहेत. अल्बर्ट आईन्स्टाईन आणि नॅथन रोजेन यांनी अश्या सेतूची कल्पना मांडली. म्हणूनच या सेतूला आइन्स्टाइन- रोजेन ब्रिज असं नाव देण्यात आलं आहे.  ल्युडविग फ्लॅम यांनी कृमीविवराची संकल्पना सर्वप्रथम मांडल...

कितने तेजस्वी तारे है हमारे पास!

Image
 कितने तेजस्वी तारे है हमारे पास! उगवत्या किंवा मावळत्या सूर्याला पाहणे हा सुंदर अनुभव असतो, मात्र आपल्याकडं उगवत्या सूर्याला अधिक महत्त्व दिलं आहे. “उगवत्या सूर्याला दंडवत” असा मराठीत वाक्प्रचारदेखील आहे. मात्र आपण जो सूर्य पाहत असतो तो साडेआठ मिनिटं शिळा असतो! तुम्ही म्हणाल की असं कसं? प्रकाशाचा वेग एका सेकंदाला सुमारे ३ लाख किलोमीटर असतो. या वेगाने सूर्य ते पृथ्वी हे अंतर पार करण्यास प्रकाशकिरणांना साडेआठ मिनिटं लागतात. एखादी गोष्ट आपल्याला दिसते, याचा अर्थ त्या वस्तूपासून निघालेला प्रकाश आपल्यापर्यंत पोचतो. जेव्हा आपण आकाशात व्याधाचा तारा पाहत असतो, तेव्हा आपण सुमारे साडेआठ वर्ष जुना तारा पाहत असतो. त्याच्यापासून निघालेला प्रकाश आपल्याला ८.६ वर्षांनी दिसतो कारण तो पृथ्वीपासून ८.६ प्रकाशवर्ष दूर आहे.  प्रकाशवर्ष हे कालमापनाचं नाही तर अंतर मोजायचं एकक आहे बरं का! अंतराळातील दोन ताऱ्यातील अंतरं खूपच जास्त असतात. सूर्याला सर्वात जवळ असलेला दुसरा तारा म्हणजे अल्फा सेंटोरी हा ३७८०० अब्ज किलोमीटर दूर आहे. इतर अंतरं त्याहून कैकपटीने अधिक आहेत. ही अंतरं सोप्या पद्धतीनं मांडण्यासाठी...

ऑनलाईन गणित शिकवणी

Image
ऑनलाईन गणित शिकवणी.. फसवी जाहिरात ‼️ सध्या गणिताचे ऑनलाइन क्लासेसचे खूप फॅड निघाले आहे. स्वतः गणितामध्ये कच्चे असलेले पालक आपली मुलं गणितामध्ये हुशार व्हावी यासाठी खूप कॉनशस असतात, त्याचा फायदा घेऊन असल्या कलासची दुकाने चालतात.. आता सोबतच्या चित्रात तुम्ही पाहू शकता की वर्गमूळ काढण्याची किती सोपी पद्धत शिकवली आहे. केवळ सर्व अंकांची बेरीज करायची आणि त्यातून. दोन वजा करायचे की आले उत्तर . त्यांनी याची चार उदाहरणे देखील दिली आहेत. ५ चा वर्ग २५, ८ चा वर्ग ६४, १४ चा वर्ग १९६ आणि १७ चा वर्ग २८९, पालक विचार करतील की यार एवढे सोपे होते, मात्र आपल्याला कसे ठाऊक नव्हते. आणि या क्लासेस वाल्यांकडे अश्या किती आयडिया असतील..ते आपल्या पोरांना अश्या क्लासेस ला घालतात  मात्र इथे चक्क हे क्लासवाले धूळ फेक करत आहेत. कारण ते जो सांगतात तो नियम नाही, योगायोग आहे, आणि तो केवळ चार ठिकाणीच लागू होतो. कोणताही नियम असा असतो, जो सर्व ठिकाणी लागू पडतो. इथे त्यांनी १९६ चे वर्गमूळ १४ कसे हे दाखवले आहे. मात्र १३ चा वर्ग असलेल्या १६९ मध्ये देखील तेच अंक असतात, तिथे क्लास वाले शिकवतात ती आयडिया लागू पडत नाही. थोड...

चावट भुंगा

Image
चावट भुंगा "भवरेने खिलाया फुल.. फुलको बेच रहा राजकुंवर" गाणं चुकलं का.. जाऊ द्या सध्या विकायचे दिवस सुरू आहेत. मात्र कवी आणि शाहिरांनी सर्वात जास्त प्रेम कोणत्या कीटकावर केलं असेल, तर तो म्हणजे भुंगा होय! कितीतरी लावणी, भावगीते, भक्तिगीतांमध्ये भुंग्याच्या गुंजारवाची दखल घेतली आहे. खरं तर याची भूणभूण डासापेक्षा किती तरी तीव्र असते, मात्र तरीही एखादी व्यक्ती प्रेमात असेल, त्यावेळेस तिला ही भुणभुण गोड गुणगुण वाटते, आणि त्यावर ती कविता लिहिते. अर्थात प्रेमात असताना व्यक्तीला आपल्या जोडीदाराचं बोलणं देखील गुणगुण वाटत असतं, मात्र लग्न झाल्यावर ती भूणभूण वाटायला लागते!! शृंगारकाव्यात भुंगा चावट म्हणून का बदनाम केला आहे काय माहित? कारण भुंगा अजिबात चावट नसतो. नर भुंगा खरं तर पोट भरायला या फुलापासून त्या फुलावर जात असतो. कामानिमित्त विविध व्यक्तींना भेट देणाऱ्या व्यक्तीला थोडीच आपण बदनाम करत असतो का? नाही ना.. म्हणजे भुंगा अजिबात चावट नाही. गंमत म्हणजे परागवेचनाचं काम मादीपेक्षा अधिक निगुतीनं नर करत असतो, नर भुंगा असेल तर फुलाची काळजी घेतली जाते.  मादीवर जर पराग वेचायची वेळ आ...

रेशमाच्या किड्यांनी

Image
रेशमाच्या किड्यांनी रेशीम.. केवळ धागा नाही तर नात्यांना, संस्कृतींना आणि जगाला जोडणारा एक बंध.. युरोपमधून आशियाकडे येणारा रस्ता हा सिल्क रुट म्हणून ओळखला जायचा यावरून रेशमाचं तत्कालीन व्यापारातील महत्त्व लक्षात येऊ शकतं. पुढं याच मार्गांने बौद्ध धर्माचा प्रसार झाला. जगज्जेता सिकंदर जेव्हा भारतात आला, तेव्हा इथला गरीब माणूस देखील रेशमी वस्त्रं, ती देखील अंगभर, वापरतो आहे हे पाहून त्याला मत्सर वाटला होता. असं हे रेशीम! राखीच्या रेशमी धाग्याने बहिणभावामध्ये “हे बंध रेशमाचे” तयार होतात, मात्र हे रेशीम कसं तयार होतं? रेशीम तयार करतो रेशमाचा किडा... हजारो वर्षांपासून आपल्या पूर्वजांना कपडे पुरवणाऱ्या या किड्याची माहिती घेतली पाहिजे ना!  रेशमाच्या धाग्यांसाठी बॉम्बिक्स मोरी या प्रजातीच्या कीटकांचा वापर केला जातो. मलबेरी म्हणजेच तुतीच्या पानांवर या किड्यांचं पालनपोषण केलं जातं. या वनस्पतीच शास्त्रीय नाव मोरस अल्बा असल्यामुळं या बॉम्बिसिडी कुळातील प्रजाती असलेल्या या कीटकाला बॉम्बिक्स मोरी असं शास्त्रीय नाव मिळालं आहे. साडीच्या दुकानात गेल्यावर टसर सिल्क, मुगा सिल्क वगैरे शब्द आपण पहिल्...

कीटक उवाच:

Image
कीटक उवाच: रिच्यापुराणातील आठव्या अध्यायात भगवान विचारतात की आम्ही तुम्हा कीटकांपासून मुक्ती का मिळवू शकत नाही. भगवान उवाच: कथं वयं भवतः मुक्तिं कर्तुं न शक्नोमि? कीटक उवाच : अहं भवतः अपेक्षया श्रेष्ठः अस्मि। अहं पृथिव्याः एकमात्रः देवः अस्मि. अर्थात तुम्ही आमच्यापासून मुक्ती मिळवू शकत नाही, कारण आम्ही तुमच्यापेक्षा सरस आहोत. या पृथ्वीवर आम्हीच एकमात्र देव आहोत. “देवांना ही नाही कळला अंतपार ज्याचा” असा हा कीटकांचा चिवट प्रवर्ग. आणि त्यातही आपल्या केसांना चिकटून बसणारी उ हा प्रचंड चिवट असा कीटक! “कोण नाही कोणचा आणि वरण भात लोणचा” हे जीवनातील अंतिम सत्य असेल तर उ मात्र त्याला अपवाद ठरते. आई वडील, बहिण भाऊ, जोडीदार, मुलं, मित्रमंडळी यापैकी कोणीही असो, व्यक्तीच्या सर्वच नात्यांमध्ये भविष्यात अहंकाराची दरी येऊ शकेल. अडचणीच्या वेळी ही सर्व मंडळी पाठ फिरवतील. मात्र उ हा असा साथी असतो, जो आयुष्यभर व्यक्तीची साथ देत राहतो. व्यक्तीचा आर्थिक स्तर कितीही ढासळला, तरी तिची साथ कायम असते. व्यक्तीने त्या उवेला मारायला काही उपाययोजना केली तरी त्याचीदेखील खुन्नस उ कधी धरत नाही. आपला सर्व अहं...

उपद्व्यापी वाळवी

Image
उपद्व्यापी वाळवी “भ्रष्टाचार ही देशाला लागलेली वाळवी आहे.” हे नेहमी वापरलं जाणारं वाक्य असो अथवा “मधुमेह म्हणजे आपल्या शरिराला लागलेली वाळवी आहे.” असं वाक्य! वाळवीचं रूपक वापरून “हाताबाहेर गेलेल्या परिस्थितीचं” धोकादायक चित्रण अनेक वेळा केलं जातं. सध्याच्या भ्रष्ट वातावरणात रोजच कानावर पडणारा हा शब्द आहे. अशीच परिस्थिती कायम राहिली तर एक दिवस अशी वेळ येईल की वाळवी ही केवळ लोकशाहीला किंवा सरकारी व्यवस्थेलाच लागते असं पुढच्या पिढीचा समज होईल. या पिढीने कदाचित “झाडाचं खोड खाण्याची खोड” असलेली खरी वाळवी कधी पाहिली नसेल, मात्र त्यांना वाक्प्रचार ठाऊक असेल! वाळवीला अर्थात तुमच्या म्हणी आणि वाक्प्रचाराशी काही घेणं देणं नाही. त्यांना केवळ “हाती घ्याल ते तडीस न्याल” ही एकच म्हण ठाऊक आहे. त्यामुळे जो पदार्थ ते चावायला घेतात, त्याचा पूर्ण भुगा केल्याशिवाय त्या शांत बसत नाहीत. मॅरेथॉनमध्ये धावत असल्याप्रमाणे वाळवी सतत मात्र मंद गतीने खात असते.  हिंदी भाषेत दीमक, उधई तर संस्कृतमध्ये वल्म म्हणवून घेणारा हा कीटक झुरळ आणि मुंगी या दोघांशी नाते सांगतो. हा जीव तिच्या उपद्व्यापांमुळे बदनाम आण...