⌛अपना टाइम आएगा..🕰️

⌛अपना टाइम आएगा..🕰️ "कालाय तस्मै नमः" आजवर भर्तृहरीचे हे वचन आजवर केवळ "वक्त ने किया क्या हसिं सितम" चे रडगाणे ऐकावयाला वापरलेले पाहिले.. पण खरच त्यावर कधी जास्त विचार नव्हता केला.. कधी वर्गात बोअरिंग लेक्चर सुरू असेल तेव्हा वेळ जाता जात नाही.. मात्र खास व्यक्तीचे हात हातात घेऊन बसलो असलो तर वेळ कसा भूर्रर उडून जातो.. हा वेळ खरच खूप जादूगार आहे राव.. परवा एफबी साथी आरजे शीतल पाटील यांच्यासोबत घड्याळाची माहिती शेअर करताना वाटले किती रंजक माहिती दडली आहे कालमापणाच्या इतिहासात.. आदीम काळापासून मानवाला वेळेची किंमत असणारच.. कारण सूर्यप्रकाश हाच प्रकाशाचा एकमेव स्त्रोत तेव्हा असणार.. मात्र तेव्हा त्या मानवाला भूक लागली की खायचे आणि झोप लागली की झोपायचे नाटक एवढेच काम ( पुलंच्या तुझे आहे तुजपाशी मधले काकाजी आठवले राव) तो एक काळ होता आणि आजचा हा काळ.. कालाय तस्मै नमः.. काळाला वंदन केलेच पाहिजे घड्याळ हे आजमितीला मानवाच्या हाताला नाही तर नशिबाला बांधले आहे असे म्हणले तर वावगे ठरणार नाही.. त्यातही मुंबई पुण्यासारख्या महानगरात राहायचे म्हणले की आयुष्यभर घोड्या...